आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • India Overtakes United States In Total Number । Vaccines Administered । Health Ministry

लसीकरणात भारत आघाडीवर:भारतात आतापर्यंत 32.36 कोटी लोकांनी घेतले व्हॅक्सीन डोस; 10 पॉइंट्समध्ये समजून घ्या कसे लसीकरणात अमेरिकेला पिछाडीवर टाकून पुढे निघाला भारत

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोनाविरुद्धच्या लसीकरणात भारताने अमेरिकेला पिछाडीवर टाकले आहे. अमेरिकेत आतापर्यंत 32.33 कोटी लोकांना लसींचे डोस देण्यात आले. तर भारतात व्हॅक्सीनेशन डोस घेणाऱ्यांची संख्या 32.36 कोटी झाली आहे. विशेष म्हणजे, भारतात लसीकरण सुरू होण्याच्या एका महिन्यापूर्वीच अमेरिकेने याची सुरुवात केली होती. देशात आतापर्यंत 32 कोटी 36 लाख 63 हजार 297 डोस देण्यात आले आहेत. देशात कोरोनाचे प्रमाण घटले असतानाच लसीकरणात वेग आला आहे. 10 पॉइंट्समध्ये समजून घ्या, लसीकरणाचा वेग आणि त्यातील महत्वाचे मुद्दे...

1. गेल्या 24 तासांत भारतामध्ये कोरोनाचे 46,148 नवीन रुग्ण सापडले आहेत. या दरम्यान, कोरोनाने 979 जणांचा जीव घेतला. भारतात कोरोना रुग्णांची एकूण संख्या 3.02 कोटींपेक्षा अधिक झाली. आतापर्यंत कोरोनाने 3.96 लाख जणांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे.

2. देशात आतापर्यंत 5.6% ज्येष्ठ नागरिकांना लस देण्यात आले आहेत. अमेरिकेत 40 टक्के पेक्षा अधिक लोकांनी लस घेतली.

3. भारताने गेल्या आठड्यात 3 कोटी 91 लाख जणांना व्हॅक्सीनचे डोस दिले. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीप्रमाणे, हा लसीकरणातील एका मैलाचा दगड आहे. कॅनडा, मलेशिया अशा देशांमद्ये जेवढे नागरिक आहेत, तेवढा लोकांचे भारतात लसीकरण झाले असे सांगता येईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा देशात सुरू असलेल्या लसीकरणावर समाधानी आहेत.

4. सरकारने जारी केलेल्या माहितीप्रमाणे, रोज जेवढे नवीन रुग्ण सापडत आहेत, त्यापेक्षा अधिक रुग्ण बरे होत आहेत. हेच प्रमाण गेल्या 45 दिवसांपासून कायम आहे. दररोजच्या सरासरी नवीन रुग्णांमध्ये शुक्रवारी 2.94% संक्रमण दर दिसून आला आहे. 21 दिवसांपूर्वी हा रेट 5% होता.

5. देशातील 12 राज्यांमध्ये डेल्टा प्लस व्हॅरिएंट अजुनही चिंतेचा विषय आहे. या 12 राज्यांमध्ये 52 पेक्षा अधिक प्रकरणे सापडली आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने आंध्रप्रदेश, गुजरात, हरियाणा, जम्मू-काश्मीर, पंजाब, कर्नाटक, राजस्थान आणि तामिळनाडूला पत्र पाठवून टेस्टिंग, ट्रॅकिंग आणि व्हॅक्सीनेशन वाढवण्यास सांगितले. या राज्यांसाठी गाइडलाइन सुद्धा जारी करण्यात आले.

6. दर महिन्याला रेडिओवर प्रसारित होणाऱ्या मन की बातमध्ये पंतप्रधानांनी लसीकरणाचे अपील केले आहे. आपण स्वतः आणि 100 वर्षांच्या आई दोघांनी दोन्ही लस घेतल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे, लसीकरणाशी संबंधित अफवांवर विश्वास ठेवू नका असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

7. व्हॅक्सीनेशनवर सुप्रीम कोर्टाने केंद्राच्या भूमिकेवर सवाल उपस्थित केले. सर्व प्रौढ नागरिकांचे लसीकरण करण्यासाठी या वर्षाच्या शेवटपर्यंत 188 डोस मिळणे अपेक्षित आहेत असेही न्यायालयाने म्हटले आहे.

8. लसीकरणात लिंगभेद दिसून येत आहे. देशात एकूण लसीकरणामध्ये 54% पुरुष आणि 46% महिलांनी लस घेतल्या आहेत. अर्थात स्त्री-पुरुषांमध्ये झालेल्या लसीकरणात 8% ची तफावत आहे. नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्हीके पॉल यांनी हे अंतर कमी करण्याची गरज व्यक्त केली आहे.

9. देशात 12 ते 18 वर्षे वयोगटातील व्यक्तींसाठी ऑगस्टमध्ये लस येणार असे संकेत आहेत. झायडस कॅडिलाच्या व्हॅक्सीनच्या टेस्टचे परिणाम जुलैच्या शेवटपर्यंत समोर येतील. यानंतर हे व्हॅक्सीन संबंधित वयोगटातील मुला-मुलींना देता येईल. विशेष म्हणजे, कंपनीने आपल्या लसींच्या वापरासाठी आपातकालीन मंजुरी मागितली आहे.

10. एम्सचे प्रमुख डॉ. रणदीप गुलेरिया यांनी सांगितल्याप्रमाणे, लसीकरण देशभरातील शाळा उघडण्यात महत्वाची भूमिका बजावू शकतात. तर आयसीएमआरने जारी केलेल्या माहितीनुसार, तिसरी लाट येईपर्यंत आपल्याला 6 ते 8 महिन्यांचा वेळ मिळेल. अशात आपण रोज एक कोटी लस देऊन मोठ्या लोकसंख्येचे लसीकरण करण्याचे लक्ष्य पूर्ण करू शकतो.

बातम्या आणखी आहेत...