आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मॅन्युफॅक्चरिंग हब:अमेरिकेला मागे टाकत भारत ठरला जगात दुसरा आकर्षक मॅन्युफॅक्चरिंग हब; गतवर्षी भारत तिसरा, चीन पहिल्या क्रमांकावर कायम

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • जुलैमध्ये नोंदणीकृत कंपन्या मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रातील

अमेरिकेला मागे टाकत भारत जगातील सर्वात आकर्षक मॅन्युफॅक्चरिंग हब झाला आहे. प्रामुख्याने कामकाजाचे वातावरण आणि खर्चाच्या आघाडीवर स्पर्धा असल्याने भारताने हा टप्पा प्राप्त केला आहे. याशिवाय भारताने आऊटसोर्सिंगची आवश्यकता यशस्वीरीत्या पूर्ण केली आहे.

यामुळे वार्षिक आधारावर भारताच्या रँकिंगमध्ये सुधारणा झाली आहे. रिअल इस्टेट सल्लागार कुशमन अँड वेकफील्ड यांच्या ग्लोबल मॅन्युफॅक्चरिंग रिस्क इंडेक्स-२०२१ मध्ये ही माहिती समोर आली आहे. त्यानुसार, चीन जगातील सर्वात आकर्षक मॅन्युफॅक्चरिंग हब झाला आहे. गेल्या वर्षीच्या अहवालात अमेरिका दुसरा आणि भारत तिसऱ्या क्रमांकावर होता. हा निर्देशांक युरोप, अमेरिका आणि आशिया-प्रशांतच्या(एपीएसी) ४७ देशांपैकी जागतिक मॅन्युफॅक्चरिंगसाठी आकर्षक ठिकाणांचे आकलन करते.अहवालानुसार, जगात सर्वात जास्त मागणीच्या मॅन्युफॅक्चरिंग ठिकाणांत अमेरिका तिसरा, कॅनडा चौथा, झेक गणराज्य पाचवा, इंडोनेशिया सहावा, लिथुआनिया सातवा, थायलंड आठवा, मलेशिया नववा आणि पोलंड दहाव्या क्रमांकावर आहे.

४ मुख्य मानकांवर दिले रँकिंग : मॅन्युफॅक्चरिंगला नव्याने सुरू करण्यात देशाची क्षमता, व्यावसायिक वातावरण, ऑपरेटिंग कॉस्ट आणि जोखीम या चार मानकांचा रँकिंगसाठी या मानकाचा वापर केला आहे.

जुलैमध्ये नोंदणीकृत कंपन्या मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रातील
सध्याच्या एकूण कंपन्यांमध्ये मॅन्युफॅक्चरिंग कंपन्यांची हिस्सेदारी २०% अाहे. मात्र, जुलैमध्ये त्यांची हिस्सेदारी वाढून २१% वर पोहोचली आहे. कंपनी मंत्रालयानुसार, गेल्या महिन्यात देशात एकूण १५,४९९ कंपन्या नोंदणीकृत झाल्या. यापैकी २१% म्हणजे, ३,२१७ कंपन्या मॅन्युफॅक्चरिंगशी संबंधित आहेत. हे बिझनेस सर्व्हिसेस कंपन्यांनंतर जास्त आहे.

बातम्या आणखी आहेत...