आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी विशेष:भारत, पाकिस्तान आणि बांगलादेशची हवा सर्वात प्रदूषित; वायुप्रदूषणामुळे दरवर्षी 3.50 लाख गर्भधारणा हाेते कमी

नवी दिल्ली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • द. आशियात गर्भावस्थेवर प्रदूषणाचा होणारा प्रभाव दाखवणारे पहिले संशोधन

जगात ज्या भागात सर्वाधिक हवा प्रदूषित आहे तेथे गर्भधारणेचे नुकसान, गर्भपात आणि मृत बाळाचे जन्म सर्वाधिक आहेत. लँसेट हेल्थ जर्नलच्या एका नव्या संशोधनानुसार वायुप्रदूषणाचा थेट गर्भपाताशी संबंध आहे. संशोधकांना दिसून आले की, भारत, पाकिस्तान आणि बांगलादेशात जास्त वायुप्रदूषणामुळे दरवर्षी ३ लाख ४९ हजार ६८१ गर्भधारणा कमी होत आहेत. संशोधकांनुसार जर या देशांनी भारताच्या वायू गुणवत्तेची पातळी गाठली तर दरवर्षी गर्भपातात ७ टक्के घट होऊ शकते. वायू प्रदूषणाचा थेट आईवर प्रभाव पडतो. दुसऱ्या एका संशोधनानुसार वायुप्रदूषणामुळे आईची नाळ तुटू शकते आणि भ्रूणापर्यंत जात नुकसान करू शकते.

पृथ्वीवरील सर्वाधिक प्रदूषित भागापैकी एक दक्षिण आशियात गर्भधारणेवर प्रदूषणाचा परिणाम दाखवणारे हे पहिले संशोधन आहे. संशोधनाचे निष्कर्ष सार्वजनिक आणि मातृ आरोग्यात सुधारणा करण्यासाठी महत्त्वाचे असल्याचे संशोधकांनी म्हटले आहे. विशेषत: गरीब देशांसाठी. गर्भाचे नुकसान जगात दक्षिण आशियात सर्वाधिक असून तो जगातील सर्वाधिक पीएम २.५ प्रदूषित भाग आहे. मुख्य संशोधक पीकिंग विद्यापीठाचे लेखक सहायक प्राध्यापक डॉ. टाओ झुई यांनी म्हटले आहे की, जेव्हा आपण श्वास घेतो तेव्हा पीएम २.५ चे सूक्ष्म प्रदूषित कण फुप्फुसात जातात आणि रक्तात मिसळतात. सर्वाधिक प्रदूषित कण ऊर्जा प्रकल्प, उद्योग आणि वाहनांच्या उत्सर्जनातून निघतात. हे कण फुप्फुस आणि हृदयाशी संबंधित आजार आणि कमकुवत रोगप्रतिकारक शक्तीसाठी जबाबदार असतात. संशोधनानुसार भारत आणि पाकिस्तानच्या उत्तर भागात वायुप्रदूषणाशी गर्भपाताचा जास्त संबंध आहे. शहरी भागात कमी वयाच्या मातांच्या तुलनेत जास्त वयाच्या मातांना जास्त धोका आहे. संशोधकांनी १९९८ पासून २०१६ पर्यंतच्या आकडेवारीवर अभ्यास केला. संशोधनात गर्भपात झालेल्या ३४१९७ महिलांचा समावेश करण्यात आला होता.

भारतात वायू गुणवत्ता डब्ल्यूएचओच्या मानकाच्या चारपट वाईट
संशोधकांनी सूक्ष्म धूलिकणांवर लक्ष केंद्रित केले. त्यांना २००० ते २०१६ दरम्यान आढळले की, दक्षिण आशियात आई प्रदूषित हवेत गेल्याने ७.१ टक्के गर्भपात झाले. भारताची सध्याची वायू गुणवत्ता ४० मायक्रोग्रॅम प्रति घनमीटर आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या वायू गुणवत्ता मार्गदर्शक सूचनेनुसार १० मायक्रोग्रॅम प्रति घनमीटर सुरक्षित मानली जाते. संशोधनात म्हटले आहे की, जगात प्रदूषित हवेमुळे २९ टक्के गर्भपात होतात.

बातम्या आणखी आहेत...