आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • India Pakistan Border In Barmer To Be Open To Farmers After 28 Years; Like Punjab, Rajasthan Will Provide BSF For Agriculture; News And Live Updates

पुढाकार:​​​​​​​बाडमेरमध्ये भारत-पाकिस्तान सीमारेषा 28 वर्षांनंतर शेतकऱ्यांसाठी होईल खुली; पंजाबप्रमाणेच राजस्थानमध्ये शेतीसाठी बीएसएफ देईल मार्ग

बाडमेर (राजस्थान)एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • कुंपणापलीकडे जाऊन करता येईल शेती व सिंचन, नवे प्रवेशद्वारही बनवले

बीएसएफच्या पुढाकारामुळे २८ वर्षांनंतर सीमेवरील कुंपण आणि झीरो पॉइंट दरम्यान अडकलेल्या लाखो एकर जमिनीचा आता हजाराे शेतकऱ्यांना अधिकार प्राप्त होईल. बीएसएफने शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीत शेती करण्याची सूट दिली आहे. यासाठी नवे प्रवेशद्वारही बनवण्यात आले आहेत. बीएसएफने दिलेला पास दाखवून शेतकऱ्यांना शेतात जाता येईल. पंजाबप्रमाणेच आता चौहटनच्या जाटों का बेरा, सारला भागात शेतकऱ्यांना शेतीसाठी गेट उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. बीएसएफ डीआयजी विनीतकुमार यांनी काही दिवसांपूर्वी सारला येथे शेतकऱ्यांसोबत बैठक घेतली आणि त्यांना शेतीसाठी कुंपणापलीकडे जाण्यासाठी अर्ज करण्याचे सांगितले होते.

दु:ख : अनेक शेतकऱ्यांची ८०% जमीन कुंपण-झीरो पॉइंटदरम्यान अडकलेली

सीमेचे कुंपण-झीरोलाइनदरम्यान हजारो एकर जमीन अडकली आहे. २८ वर्षांपासून या जमिनीचा ना मोबादला भेटला ना शेतकऱ्यांना शेती करता आली. शासकीय नोंदीत मात्र ती शेतकऱ्यांच्या नावावर आहे. यामुळे शेतकरी त्यांच्या जमिनीचा अधिकार मिळवण्यासाठी केंद्र व राज्य सरकार तसेच उच्च न्यायालयातही गेले. २०१३ मध्ये उच्च न्यायालयाने शेतकऱ्यांच्या बाजूने निकाल देत शेतकऱ्यांना जमीन किंवा भरपाई देण्याचे निर्देश दिले होते. मात्र अद्याप शेतकऱ्यांना अधिकार मिळाले नाहीत.

सीमेपलीकडे शेतीसाठी ८ तासांची सूट, महिलांसाठी वेगळी खोली

  • पाससाठी शेतकऱ्यांना शेती पुरावा आणि छायाचित्र ओळखपत्रासह संबंधित चौक्यांवर अर्ज करावा लागेल. चौकशीनंतर फोटो ओळखपत्र दिले जाईल.
  • ज्या शेतकऱ्यांच्या सीमेच्या कुंपणाआधी ट्यूबवेल आहेत आणि त्यांना शेतात पाणी द्यायचे असेल त्यांना पाइपलाइन टाकता येईल.
  • पिकांचे नुकसान होऊ नये म्हणून शेतकऱ्यांना जमिनीच्या चारही बाजूला ४ फुटांची जाळी लावता येईल.
  • पास बघून शेतकऱ्यांना सकाळी ९ वाजता प्रवेश दिला जाईल. सायंकाळी ५ वाजता कडक तपासणी होईल आणि त्यानंतरच ते परत येतील. महिलांसाठी प्रत्येक पोस्टवर खोली तयार करण्यात आली आहे.
बातम्या आणखी आहेत...