आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • India Pakistan Border । Indian Army Jawan Reaches Pakistan By Mistake, BSF Officers Meet With Pak Rangers

भारतीय जवान चुकून पाकिस्तानी हद्दीत पोहोचला:BSF अधिकाऱ्यांनी पाक रेंजर्ससोबत बैठक घेतली, तेव्हा कुठे भारतात परतला

अनुज शर्मा, अमृतसर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंजाबमधील भारत-पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेवर तैनात असलेल्या सीमा सुरक्षा दलाचा (बीएसएफ) जवान गुरुवारी सकाळी साडेसहा वाजता चुकून झीरो लाइन ओलांडून पाकिस्तानच्या हद्दीत पोहोचला. दाट धुक्यामुळे तरुणाने ही चूक केली. हा जवान पाकिस्तानी भागात पोहोचताच पाक रेंजर्सनी त्याला अटक केली.

बेपत्ता झालेला जवान बीएसएफच्या 66 बटालियनचा आहे. त्याने सीमा ओलांडल्याची माहिती मिळताच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी धाव घेतली. पाकिस्तानी रेंजर्सच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी तातडीने संपर्क साधला असता त्यांनी बीएसएफ जवान त्यांच्या ताब्यात असल्याची पुष्टी केली.

यानंतर BSF अधिकाऱ्यांनी पाक रेंजर्ससोबत तातडीची बैठक बोलावून जवानाला सोडण्यास सांगितले. सुरुवातीला नकारघंटेनंतर पाक रेंजर्स अखेर BSF जवानाला सोडण्यास तयार झाले. ही संपूर्ण घटना पंजाबमधील BSFच्या फिरोजपूर सेक्टरमधील अबोहर भागातील आहे.

हजेरीदरम्यान जवान बेपत्ता असल्याचे कळले

धुके इतके दाट होते की BSFला त्यांचा एक साथीदार बेपत्ता असल्याचे तीन तासांपर्यंत कळलेच नाही. सीमेवर गस्त घालण्यासाठी गेलेले जवान सकाळी 9.30 वाजता परतल्यावर त्यांची हजेरी घेण्यात आली. यादरम्यान एक जवान बेपत्ता आढळला. इकडे-तिकडे शोध घेऊनही जवानाबाबत काहीच माहिती मिळाली नाही, तेव्हा बटालियनमध्ये एकच खळबळ उडाली.

यानंतर तातडीने संपूर्ण परिसरात शोधमोहीम राबवण्यात आली, मात्र जवान आढळला नाही. लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पाकिस्तानी रेंजर्सशी संपर्क साधला असता त्यांनी जवान त्यांच्या ताब्यात असल्याचे स्पष्ट केले. हा जवान आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून त्यांच्या भागात पोहोचल्यामुळे त्याला अटक करण्यात आल्याचे पाकिस्तानी रेंजर्सकडून सांगण्यात आले.

लागोपाठ बैठका, असा परतला जवान

BSFच्या 66 बटालियनच्या अधिकाऱ्यांनी तत्काळ आपल्या उच्च अधिकाऱ्यांना शत्रू देशाच्या सीमेवर पोहोचलेल्या जवानाची आणि त्याच्या अटकेची माहिती दिली. यानंतर पाकिस्तानी रेंजर्ससोबत तातडीची बैठक बोलावण्यात आली. BSF अधिकाऱ्यांनी अनेक बैठका घेतल्या, त्यानंतर पाकिस्तानी रेंजर्सनी BSF जवानाला सोडण्यास सहमती दर्शवली. दुपारनंतर पाक रेंजर्सनी आपल्या जवानाला भारताकडे सुपूर्द केले.

सीमेवरील कुंपणाच्या पलीकडेही भारताचे क्षेत्र

पाकिस्तानकडून होणारी घुसखोरी आणि शस्त्रास्त्रांची तस्करी रोखण्यासाठी भारताने कुंपण घातले आहे. 10 ते 11 फूट उंचीचे हे कुंपण भारतीय हद्दीत करण्यात आले असून त्याच्या पुढे 300 ते 500 मीटर अंतरावर आंतरराष्ट्रीय सीमा (शून्य रेषा) आहे जिथे पांढरी रेषा आखली आहे. कुंपण ओलांडून भारतीय हद्दीत शेतकरी शेतीही करतात. कुंपण ओलांडणाऱ्या या शेतकऱ्यांना BSFकडून कार्ड दिले जातात. जेव्हा शेतकरी कुंपण ओलांडून शेतात जातो, तेव्हा BSFचे जवान त्याच्यासोबत पाळत ठेवण्यासाठी जातात.

कुंपणासमोरही जवानांकडून तपासणी

हिवाळ्यात दाट धुक्याचा फायदा घेत पाकिस्तानात बसलेले तस्कर भारतीय हद्दीत शस्त्रे आणि ड्रग्ज ठेवतात. भारतात सक्रिय असलेले त्याचे साथीदार गुप्तपणे ही शस्त्रे आणि ड्रग्ज आणतात. हे थांबवण्यासाठी BSFचे जवान संपूर्ण परिसरात सतत शोध घेत आहेत. शोधासाठी BSF जवान कुंपणाच्या पलीकडे भारतीय हद्दीत जात असतात. गुरुवारी याच भागात शोध घेत असलेल्या BSF जवानाला दाट धुक्यामुळे झीरो लाइन दिसली नाही आणि चुकून तो पाकिस्तानी हद्दीत पोहोचला.

हिवाळ्यात सीमेवर झीरो व्हिजिबिलिटी

पंजाबमध्ये भारत-पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेच्या दोन्ही बाजूला शेती केली जाते. यावेळी दोन्ही बाजूच्या शेतकऱ्यांनी गव्हाची पेरणी केली आहे. हिवाळ्यात दोन्ही देशांमध्ये या भागात दाट धुके असते आणि त्यामुळे येथील दृश्यमानता शून्यावर पोहोचते. कडाक्याच्या थंडीतही BSFचे जवान वेगवेगळ्या शिफ्टमध्ये 24 तास गस्त घालत असतात.

बातम्या आणखी आहेत...