आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • India Pakistan | Indian Army Soldier Martyred As Pakistan Ceasefire Violation Today In Jammu Kashmir Poonch

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

LoC वर फायरिंग:पाकिस्तानने सलग दुसऱ्या दिवशी शस्त्रसंधीचे केले उल्लंघन, राजौरीमध्ये सैन्याचे दोन जवान शहीद

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पाकिस्तानच्या सैन्याने आज राजौरी जिल्ह्याच्या सुंदरबनी सेक्टरमध्ये गोळीबार केला

पाकिस्तान लाइन ऑफ कंट्रोल (LoC) वर सलग शस्त्रसंधीचे उल्लंघन करत आहे. शुक्रवारी त्यांनी जम्मू-काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यामध्ये गोळीबार केला. यामध्ये भारतीय सैन्याचे दोन जवान शहीद झाले आहेत.

संरक्षण मंत्रालयाने सांगितले की, पाकिस्तानच्या सैन्याने आज राजौरी जिल्ह्याच्या सुंदरबनी सेक्टरमध्ये गोळीबार केला. यामध्ये सैन्याचे दोन जवान नायक प्रेम बहादुर खत्री आणि रायफलमॅन सुखबीर सिंह गंभीर जखमी झाले आहेत. यानंतर त्यांनी प्राण सोडले. भारतीय सैन्य या नापाक कारवाईला सडेतोड उत्तर देत आहे.

एक दिवसपूर्वी सूबेदार शहीद झाले होते
गुरुवारी दुपारी जवळपास 1.30 वाजताही पाकिस्तानने पुंछ जिल्ह्याच्या किरनी, कस्बा आणि शाहपूर सेक्टरमध्ये मोर्टारसोबत छोट्या हत्यारांनी गोळीबार केला. यामध्ये सैन्याचे सूबेदार स्वतंत्र सिंह शहीद झाले होते. तर एक नागरिक जखमी झाला होता. स्वतंत्र सिंह उत्तराखंडच्या गडवाल जिल्ह्याचे राहणारे होते. काही दिवसांपूर्वीच पाकिस्ताने सैन्याने पुछच्या डिगवार, मालती आणि दल्लन परिसरातही सीजफायरचे उल्लंघन केले होते.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser