आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नियंत्रण रेषा:पाकिस्तानकडून काश्मीरच्या कुपवाडामधील एलओसी परिसरात दोन बॉम्ब हल्ले, महिला आणि मुलासह तीन जणांचा मृत्यू

श्रीनगरएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • पाकिस्तानने कुपवाडामधील गुज्जरांच्या गांवाला निशाना बनवले, पाककडून सलग चौथ्या दिवशी फायरिंग

काश्मीरच्या कुपवाडामध्ये पाकिस्तानकडून झालेल्या फायरिंगमध्ये एक मुलगा आणि महिलेसह तीन जणांचा मृत्यू झाला आहे. रविवारी पाकिस्तानकडून होत असलेल्या फायरिंगचा हा चौथा दिवस आहे. 

भारतीय सेनेने सांगितल्यानुसार, पाकिस्तानने संध्याकाळी 4.30 वाजता कुपवाडाच्या केरन सेक्टरमधील घरांना निशाना बनवून बॉम्ब फेकले. यात चौकीबल कुपवाडामध्ये राहणाऱ्या एका आठ वर्षांचा मुलगा जियान, 17 वर्षीय जावेद खान आणि 37 वर्षीय शमीमा बेगम या तिघांचा मृत्यू झाला.,

अनेक घरांना आग लागली

फायरिंगमुळे परिसरातील अनेक घरांना आग लागली. पाकिस्तानकडून बॉम्ब हल्ले केल्यामुळे गावातील लोक घाबरले आहेत. सेनेने सांगितल्यानुसार, पाकिस्तानच्या फायरिंगनंतर भारतानेही त्याला प्रत्युत्तर दिले. या पाकमधील दहशतवादी ठिकाणे आणि पाकिस्तानमध्ये मोठे नुकसान झाले आहे.

बातम्या आणखी आहेत...