आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • India Pakistan Tension | Line Of Control (LOC), Jammu And Kashmir, Two Pakistan Army Soldiers Killed, Ceasefire Violation

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

LoC वर पाकिस्तानची फायरिंग:नौशेरा सेक्टरमध्ये शस्त्रसंधीचे उल्लंघन, कारवाईत सैन्याने 2 पाकिस्तानी सैनिकांना घातले कंठस्नान

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 26 नोव्हेंबरला भारतीय सैन्याचे हवालदार शहीद झाले होते

भारतीय सैन्याने लाइन ऑफ कंट्रोल (LoC) वर जम्मू-कश्मीरमध्ये नौशेरा सेक्टर ओलांडून दोन पाकिस्तानी सैनिक मारले. पाकिस्तानकडून मंगळवारी येथे शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. भारतीय सैन्याने याचे सडेतोड उत्तर दिले आणि पाकिस्तानचे दोन सैनिक ठार केले. सैन्याच्या सूत्रांनी बुधवारी ही माहिती दिली.

10 डिसेंबरला पाच सैनिकांना मारले होते
यापूर्वी 10 डिसेंबरला पाकिस्तानी सैन्याने सीमेवर रात्रभर फायरिंग केली होती. फायरिंगचे केंद्र जम्मू-कश्मीरचे पुंछ सेक्टर होते. भारतीय सैन्याने प्रत्युत्तराच्या कारवाईत पाकिस्तानच्या पाच सैनिकांना ठार केले होते. त्यांचे तीन सैनिकही ठार झाले होते.

26 नोव्हेंबरला भारतीय सैन्याचे हवालदार शहीद झाले होते
जम्मू-कश्मीरच्या राजौरी जिल्ह्याच्या नौशेरा सेक्टरमध्ये 24 नोव्हेंबरला पाकिस्तानच्या फायरिंगमध्ये भारतीय सैन्याचे एक हवालदार शहीद झाले होते. भारताने पाकिस्तानी सैन्याला त्याच भाषेत उत्तर दिले होते.

आतापर्यंत 3200 सीजफायर वॉयलेशन
1999 मध्ये युद्धबंदीच्या उल्लंघनांबाबत दोन्ही देशांनी करार केला होता. पाकिस्तान या कराराचे सतत उल्लंघन करत आहे. यावर्षी पाकिस्तानने 3200 वेळा युद्धबंदीचे उल्लंघन केले आहे. 2019 मध्ये त्यांची संख्या 3168 आणि 2018 मध्ये 1629 होती. यामध्ये 30 नागरिक ठार आणि 100 हून अधिक जखमी झाले होते.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser