आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • India Paksitan | India Reduce Staff Strength In The Pakistan High Commission In New Delhi By 50 Percent

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हेरगिरीवरुन सरकारचा निर्णय:भारताने पाकिस्तानी दूतावासातील कर्मचाऱ्यांमध्ये 50% कपातीचे दिले आदेश

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • दोन्ही देशांमध्ये 31 मे रोजी तणाव सुरू झाला, पाकिस्तान हायकमीशनचे दोन कर्मचारी हेरगिरीमध्ये अटक झाले होते

भारत आणि पाकिस्तानदरम्यान डिप्लोमॅटिक लेव्हलवर तणाव वाढला आहे. मंगळवारी संध्याकाळी भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने पाकिस्तान हायकमीशन कर्मचाऱ्यांमध्ये 50 % कपात करण्याचे आदेश दिले. भारताचा आरोप आहे की, पाकिस्तान हायकमीशनचे कर्मचारी हेरगिरीमध्ये अटक झाले होते.

विशेष म्हमजे, भारतही इस्लामाबादमधील आपल्या हायकमीशनमध्ये 50 % कपात करेल. भारताने पाकिस्तानच्या चार्ज डी अफेअर्स सैयद हैदर शाहला सांगितले की, पाकिस्तानी हायकमीशनच्या कर्मचाऱ्यांचे वागणे वियना कन्वेंशनच्या अटी-शर्तींना पूर्ण करत नाहीत.

31 मे चे उदाहरण

वृत्तसंस्थांनी परराष्ट्र मंत्रालयाच्या हवाल्याने सांगितले की, पाकिस्तान हायकमीशनच्या कर्मचाऱ्यांची कपात करण्यास सांगितले आहे. परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी पाकिस्तानच्या चार्ज डी अफेयर्स (दूतावास संबंधी प्रकरणे पाहणारे सर्वात वरिष्ट अधिकारी) ला सांगितले की, पाकिस्तानी दूतावासचे अधिकारी आणि कर्मचारी हेरगिरी आणि दहशतवादी संघटनेत सामील होण्यासारखे काम करत आहेत. 31 मे रोजी दोन कर्मचाऱ्यांना याप्रकरणात अटक करण्यात आले.

7 दिवसांचा वेळ

पाकिस्तानच्या अधिकाऱ्यांना 7 दिवसात हाईकमीशनमध्ये 50 कर्मचारी कपात करण्यास सांगितले आहे. पाकिस्तानकडून अद्याप यावर कोणतेच स्पष्टीकरण आले नाही.

बातम्या आणखी आहेत...