आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • India Ranks Fifth In Foreign Investment In 2020; 27% Higher Investment, According To A UN Report; News And Live Updates

यूएनचा अहवाल:सन 2020 मध्ये परदेशी गुंतवणुकीत भारत पाचवा; यूएनच्या अहवालानुसार 27% जास्त गुंतवणूक

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • जागतिक एफडीआयमध्ये 35 टक्क्यांची घसरण

कोरोना महामारीतही भारतात गुंतवणूक करण्याबाबत विदेशी गुंतवणूकदारांचा उत्साह कमी झालेला नाही. संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक गुंतवणूक अहवाल-२०२१ नुसार, २०२० मध्ये भारत जगात पाचवा सर्वाधिक विदेशी गुंतवणूक मिळवलेला देश ठरला. यूएन कॉन्फरन्स ऑन ट्रेड अँड डेव्हलपमेंट हा अहवाल तयार करते.

सन २०२० मध्ये भारतात ४.७ लाख कोटी रुपयांची प्रत्यक्ष विदेशी गुंतवणूक (एफडीआय) आली. याउलट संपूर्ण जगभरात यादरम्यान गुंतवणूक कमी झालेली दिसली. २०१९ मध्ये भारतात ३.७८ लाख कोटी रुपयांची प्रत्यक्ष विदेशी गुंतवणूक आली होती. अशा प्रकारे २०१९ च्या तुलनेत वर्ष २०२० मध्ये भारताच्या एफडीआयमध्ये २७ टक्के वाढ झाली.

जागतिक एफडीआयमध्ये ३५ टक्क्यांची घसरण
अहवालानुसार, जागतिक स्तरावर २०२० मध्ये एफडीआयवर कोरोना महामारीचा जबरदस्त परिणाम झाला होता. त्यात ३५ टक्क्यांची घसरण नोंदली गेली होती. जागतिक एफडीआय २०१९ मध्ये १.५ लाख कोटी डॉलर होती, ती २०२० मध्ये घटून १ लाख कोटी डॉलरपर्यंत आली.

बातम्या आणखी आहेत...