आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • India Receive First Batch Of Russia's Sputnik V On May 1 । Vaccine Against Covid 19 । Russian Direct Investment Fund । CEO Kirill Dmitriev; News And Live Updates

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोनाविरुद्धचे युद्ध अधिक तीव्र होणार:रशियन लस 'स्पुतनिक-व्ही'ची पहिली खेप 1 मे रोजी भारतात येणार; कंपनी करणार एका वर्षात 85 कोटी डोसची निर्मिती

नवी दिल्ली11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • भारतातील परिस्थिती अत्यंत विदारक आणि हृदद्रावक - WHO

भारत देशातील कोरोना महामारीमुळे बिघडत चाललेल्या परिस्थितीत मदत करण्यासाठी अनेक देश पुढे येत आहे. दरम्यान, अमेरिकेने लसीसाठी लागणार कच्चा माल पुरवण्याचे आश्वासन दिले आहेत. तसेच ब्रिटन आणि फ्रान्समधूनदेखील ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर येत आहेत. विशेष म्हणजे सध्या कोरोना व्हायरसवर रामबाण उपाय म्हणून समजली जाणारी रशियन लस 'स्पुतनिक-व्ही'ला तेथील सरकारने मंजुरी दिली असून त्याची पहिली तुकडी 1 मे रोजी भारतात दाखल होणार आहे.

देशात सध्या लसीकरणाची मोहीम मोठ्या प्रमाणावर सुरु आहे. सर्वच राज्य लसीकरण करण्यावर जोर देत आहे. त्यामुळे अचानकपणे लसीचा अभाव पाहता भारत सरकारकडून त्याला मान्यता देण्यात आली आहे. देशात सध्याच्या घडीला रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंड (आरडीआयएफ) ही कंपनी लसीच्या उत्पादनावर व पदोन्नतीवर देखरेख ठेवत आहे. आरडीआयएफचे मुख्य कार्यकारी अधिकारी किरिल दिमित्रीव यांनी म्हटले आहे की, सध्या भारतात दरमहा 50 कोटी डोस तयार केले जातील. उन्हाळ्याचे महिने निघून गेल्यानंतर कंपनी आणखी उत्पादन वाढवेल. केंद्र सरकारने देशातील प्रमुख पाच लस उत्पादकांशी एका वर्षात 85 कोटी डोस तयार करण्याचा करार केला आहे.

कंपनीचा दावा - 18,794 रुग्णांवर चाचणी

'स्पुतनिक-व्ही' या लसीची निर्मिती करणार्‍या गॅमलिया नॅशनल रिसर्च सेंटर फॉर एपिडिमिओलॉजी अ‍ॅन्ड मायक्रोबायोलॉजीने असा दावा करतात की, ही लस कोरोनाशी लढण्यात 95% प्रभावी असल्याचे सिद्ध झाले आहे. लसीकरणाचा पहिला डोस घेतल्यानंतर 28 दिवसांनी चाचणी केली असता 91.4% कार्यक्षमता दिसली. पहिल्या डोसच्या 42 दिवसानंतर, ती 95% पर्यंत वाढली. कंपनीने पुढे म्हटले की, या लसीचे दोन डोज 39 संक्रमित व्यतिरिक्त 18,794 इतर रुग्णांना देण्यात आले होते. जगातील इतर देशांसाठी त्याची किंमत 700 रुपयांच्या खाली निश्चित करण्यात आली असून इतर लसींच्या तुलनेत 'स्पुतनिक-व्ही'ची किंमत खूपच कमी असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे.

US पुरवणार कच्चा माल
बायडेन यांच्यासोबतच्या चर्चेनंतर मोदींनी सोशल मीडियावर म्हटले - आम्ही लसीचा कच्चा माल आणि औषधांची पुरवठा साखळी प्रभावी होण्यासाठी चर्चा केली. भारत आणि अमेरिकेची हेल्थकेअर पार्टनरशिप जगात कोविड-19 मुळे निर्माण झालेल्या आव्हानांचा सामना करु शकते. आम्ही दोन्ही देशांमध्ये महामारीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर सविस्तर चर्चा केली.

सौदीवरुन 80 टन ऑक्सिजन भारतासाठी रवाना
रविवारी सौदी अरबचे जावई बंदरगाह येथून 4 क्रायोजेनिक टँकमध्ये 80 टन ऑक्सिजन भारतासाठी रवाना झाला. हे लवकरच मुंद्रा बंदरगाह येथे पोहोचेल. हे अदानी समूहाच्या नेतृत्वात आणले जात आहे.

भारतातील परिस्थिती अत्यंत विदारक आणि हृदद्रावक - WHO
कोरोना महामारीमुळे भारतातील बिघडती परिस्थिती पाहता WHO ने चिंता व्यक्त केली आहे. संघटनेचे प्रमुख डॉ. टेड्रोस गेब्रेयेसस यांनी म्हटले की, भारतात सध्या हृदद्रावक परिस्थिती आहे. गेल्या काही दिवसांपासून येथे कोरोना रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. रुग्णांचे कुटुंबीय रुग्णालयांमध्ये बेड आणि ऑक्सिजनच्या व्यवस्थेसाठी सोशल मीडियावर पोस्ट करत आहेत. राजधानी दिल्लीमध्ये एका आठवड्याचे लॉकडाऊन लावावे लागले यावरुन या गंभीर परिस्थितीचा अंदाज येऊ शकतो. टेड्रोस यांनी म्हटले की, भारत कोविड-19 च्या भयानक लाटेविरोधात लढाई लढत आहे. रुग्णालय रुग्णांनी भरले आहेत. स्मशानात मृतदेहांची रांग लागली आहे. हे परिस्थिती अत्यंत विदारक आणि हृदद्रावक आहे.

बातम्या आणखी आहेत...