आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भारतात पोहोचला ब्रिटनचा व्हायरस:भारतात नवीन कोरोना व्हायरसने संक्रमित 6 रुग्ण आढळले, हे सर्व ब्रिटनमधून नुकतेच परतले होते

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ब्रिटनमध्ये आतापर्यंत कोरोना विषाणूचे जास्त धोकादायक दोन प्रकार सापडले आहेत.

भारतातही कोरोना व्हायरसचा नवीन स्ट्रेन पोहोचला आहे. येथे सहा संक्रमितांमध्ये हा व्हायरस आढळला आहे. हे सर्व नुकतेच ब्रिटेनमधून परतले होते. मात्र हे रुग्ण नेमके कुठे आढळले आहेत याची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही. यामधून तीन सँम्पल बेंगळुरू, हैदराबाद आणि पुण्याच्या इंस्टीट्यूटमध्ये पाठवण्यात आले आहेत. ब्रिटेनमध्ये मिळाला हा व्हायरस 70% जास्त तेजीने पसरतो असे मानले जाते.

ब्रिटनमध्ये आतापर्यंत कोरोना विषाणूचे जास्त धोकादायक दोन प्रकार सापडले आहेत. पहिला प्रकार आढळल्यानंतरच 21 डिसेंबर रोजी भारत सरकारने ब्रिटनहून येणार्‍या विमानांवर बंदी घातली. 22 डिसेंबर रोजी रात्री 11.59 ते 31 डिसेंबर रोजी रात्री 11.59 पर्यंत ही बंदी घालण्यात आली होती. पूर्वीच्या उड्डाणे येथून भारतात आलेल्यांची विमानतळावरच आरटी-पीसीआरची चाचणी घेण्यात आली होती.

व्हायरसचे नवीन रुप 70% जास्त तेजीने पसरते
व्हायरसमध्ये सतत म्यूटेशन होत राहते, म्हणजे याचे गुण बदलतात. जास्तीत जास्त व्हेरिएंट स्वतःच नष्ट होतात, परंतु कधीकधी हे पूर्वीपेक्षा बरेच पटीने मजबूत आणि धोकादायक बनतात. ही प्रक्रिया इतक्या वेगाने होते की वैज्ञानिकांना एक रूपही समजत नाही आणि एक नवीन रूप समोर येत आहे. शास्त्रज्ञांचा अंदाज आहे की ब्रिटनमध्ये सापडलेल्या कोरोनाव्हायरसचे नवीन रूप पूर्वीपेक्षा 70% वेगाने पसरू शकते.

कोरोना व्हायरसमध्ये आतापर्यंत कसे बदल दिसले

कोरोना व्हायरसमध्ये आतापर्यंत अनेक बदल झाले आहेत. यामधून काही प्रकार -
N501Y: ब्रिटेनमध्ये हा स्ट्रेन मिळाला. यामध्ये अमीनो अॅसिडला N असे लिहिले आहे. हे कोरोना व्हयारसच्या जेनेटिक स्ट्रक्चरमध्ये पोजिशन-501 वर होते. आता याला Y ने रिप्लेस केले आहे.

P681H: नायजीरियामध्ये मिळालेल्या या कोरोना व्हायरस स्ट्रेनमध्ये पोजिशन-681 वर अमीनो अॅसिड P ला H ने रिप्लेस केले आहे. अमेरिकेच्या CDC नुसार, या पोजिशनमध्ये अनेक वेळा बदल झाला आहे.

HV 69/70: हा स्ट्रेन कोरोना व्हायरसमध्ये पोजिशन-69 आणि 70 वर अमीनो अॅसिड्स डिलीट होण्याचा परीणाम आहे. फ्रान्स आणि दक्षिण अफ्रिकामध्येही व्हायरसमध्ये बदल दिसला आहे.

N439K: ब्रेटनमध्ये कोविड-19 जेनोमिक्स कंसोर्टियम (CoG-UK) च्या रिसर्चर्सने या नव्या व्हेरियंटविषयी सांगितले होते. यामध्ये पोजिशन-439 वर स्थित अमीनो अॅसिड N ला K ने रिप्लेस केले आहे.

बातम्या आणखी आहेत...