आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

जगाला भारताकडून आशा:जगासाठी कोरोनाची लस भारत तयार करेल : बिल गेट्स, जगात 120 कंपन्या लसीवर संशोधन करत आहेत

नवी दिल्ली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • या वर्षाखेरिस किंवा पुढील वर्षाच्या सुरुवातीला लस येईल

भारतीय औषध कंपन्यांत जगासाठी कोरोना लस तयार करण्याची क्षमता आहे, अशी आशा मायक्रोसॉफ्टचे बिल गेट्स यांनी व्यक्त केली. भारतीय औषध कंपन्यांनी अशा संकट काळात अनेक महत्त्वाची कार्ये केली आहेत. त्याचा फायदा संपूर्ण जगाला झाला. आता कोरोना लस तयार करण्याच्या कामीही या कंपन्या सक्रिय असल्याचे ते म्हणाले. दिल्ली एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया म्हणाले, भारतात रुग्ण वेगाने वाढत आहेत. मात्र आता रिकव्हरी चांगली व मृत्युदर कमी आहे. या वर्षाखेरिस किंवा पुढील वर्षाच्या सुरुवातीला लस येईल.

जगात १२० कंपन्या लसीवर संशोधन करत आहेत. यात चार लस अंतिम टप्प्यात आहेत. यातील एक अमेरिका, दोन ब्रिटन व एक चीनमध्ये तयार होत आहे.