आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
जगातील सर्वात मोठी लस निर्माता कंपनी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया लि. अॅस्ट्राझेनेका पीएलसीद्वारे विकसित कोविड-१९ लसीचे उत्पादन सुरू करत आहे. डिसेंबरपर्यंत १० कोटी डोस तयार करण्याचे त्यांचे उद्दिष्ट आहे. पुढील महिन्यात ही लस भारतात मिळू शकते. सीरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदार पूनावालांनी ही माहिती दिली.
पूनावाला म्हणाले, अॅस्ट्राझेनेका लसीच्या शेवटच्या टप्प्यातील चाचण्यांत ती काेरोनावर मात करण्यात यशस्वी ठरली तर तिच्या उत्पादनासाठी सीरम इन्स्टिट्यूटला भारत सरकारकडून तत्काळ परवानगी मिळेल. सीरमने १ अब्ज डोसनिर्मितीचा करार केला आहे. पूनावालांनी गुरुवारी मुलाखतीत सांगितले की, वितरणाची सुरुवात भारतापासून होईल. यानंतर दक्षिण आशियात इतर देशांना लस मिळेल.
पुढील वर्षी लसीचे ५०-५० च्या आधारावर वितरण होईल. जागतिक संघटना गरीब देशांसाठी लस विकत घेतात. सीरमने ५ विकासकांसोबत लसनिर्मितीचा करार केला आहे. गेल्या २ महिन्यांत अॅस्ट्राझेनेकाच्या लसीचे ४ कोटींवर डोस तयार झाले. जगाच्या लसीकरणासाठी २०२४ साल उजाडेल. भारताची १.३ अब्ज लोकसंख्या, विशेषकरून ग्रामीण भागांपर्यंत लस पोहोचवणे हे खूप मोठे आव्हान असल्याचेही पूनावाला यांनी स्पष्ट केले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.