आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • India To Pakistan; Ministry Of External Affairs (MEA) On Pakistan Supreme Court Order On Gilgit Baltistan Election

अवैध ताबा:भारताने पाकिस्तानला सुनावले; गिलगिट आणि बाल्टिस्तान भारताचा भाग आहेत, पाक सरकार या भागात निवडणुका घेऊ शकत नाही

नवी दिल्ली3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • नुकतंच पाकिस्तानी सुप्रीम कोर्टाने गिलगिट-बाल्टिस्तानमध्ये निवडणुका घेण्यासाठी कायद्यात संशोधन करण्यास सांगितले आहे

भारताने पाकिस्तानच्या ताब्यातील गिलगिट-बाल्टिस्तानमध्ये निवडणुका होणार असल्याच्या आदेशाचा कडक शब्दात विरोध केला आहे. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने परत एकदा स्पष्टपणे सांगितले आहे की, जम्मू-काश्मीर आणि लद्दाखशिवाय गिलगिट-बाल्टिस्तानदेखील भारताचा अविभाज्य घटक आहे. काहीदिवसांपूर्वी पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टाने सरकारला गिलगिट-बाल्टिस्तानमध्ये निवडणुका करणे आणि यासंबंधि केंद्रीय कायद्यात संशोधन करण्याचे आदेश दिले आहेत. भारताची प्रतिक्रीया या आदेशानंतर आली आहे.

हा भाग पाकिस्तानने रिकामा करावा

परराष्ट्र मंत्रालयाने सांगितल्यानुसार, “गिलगिट-बाल्टिस्तान भारताचा अविभाज्य घटक आहे, त्यामुळे पाकिस्तानने या क्षेत्राला तात्काळ रिकामे करावे. या भागात त्यांचा कब्जा हा चुकीचा आहे. आम्ही पाकिस्तानच्या एका सीनियर डिप्लोमॅटकडे आमची बाजू मांडली आहे.” पाकिस्तान सुप्रीम कोर्टाने सरकारकडे 2018 च्या एका कायद्यात संशोधन करुन, तिथे निवडणुका घेण्यास सांगितले आहे.

परराष्ट्र मंत्रालयाने पुढे म्हटले की, “आम्ही पाकिस्तानला स्पष्टपणे सांगितले आहे की, जम्मू-काश्मीर, लद्दाख आणि गिलगित-बाल्टिस्तान कायद्यानुसार भारताचा भाग आहेत. कब्जा केलेल्या या भागांवर पाकिस्तानी सरकार कोणत्याच निवडणुका घेऊ शकत नाही. भारत या गोष्टीला कधीच सहन करणार नाही.” 

बातम्या आणखी आहेत...