आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • India Took Advantage Of The Armistice To Protect People Through 13 Bunkers During The Pakistani Attack

शस्त्रसंधीचा फायदा भारताने असा उचलला:पाकिस्तानी हल्ल्यात 13 बंकरद्वारे लोकांची सुरक्षा

हारून रशीद | श्रीनगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जम्मू-काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेवर शस्त्रसंधी सुरू आहे. प्रशासनाने या शस्त्रसंधीचा वापर नागरिकांची सुरक्षा व्यवस्था कडेकोट करण्यासाठी केला. याअंतर्गत पुंछ जिल्ह्यात एलओसीनजीकच्या भागांत १३ हजारांहून जास्त गोळीबार प्रतिबंधक खंदकांची निर्मिती केली आहे. या बँकर्सचा वापर पाकिस्तानच्या गोळीबारादरम्यान केला जाईल. सुरुवातीस पाकिस्तान लष्कराकडून होणाऱ्या गोळीबारामुळे शेलिंग प्रूफ बंकर्सचे बांधकाम हळूहळू होत होते. मात्र, शस्त्रसंधीनंतर त्याला वेग आला आहे. पुंछ सर्वात जास्त गोळीबार प्रभावित क्षेत्रांपैकी एक आहे. एका अधिकाऱ्याने सांगितले की, एलओसीजवळच्या भागांत १५ हजार बंकर बनवण्यास मंजुरी दिली आहे. बहुतांश बंकर्सचे बांधकाम केले आहे. उर्वरित बंकर्स लवकरच तयार केले जातील. बंकर्सचे डिझाइन अशा पद्धतीने केले आहे की, ते पाकिस्तानच्या गोळीबाराचा सामना करू शकतील.

सामुदायिक बंकरमध्ये राहू शकतील ५० नागरिक
बंकर दोन प्रकारचे आहेत. प्रत्येक कुटुंबासाठी फॅमिली बंकर आहे आणि दुसरे मोठे सामूदायिक बंकर आहे, जिथे गोळीबारादरम्यान अनेक कुटुंब सोबत राहू शकतील. फॅमिली बंकरमध्ये ८-१० लोक राहू शकतील.

शस्त्रसंधीआधी गेले ४६ लोकांचे प्राण
{२५ फेब्रुवारी २०२१ पासून लागू झाली. तेव्हा भारतीय व पाकिस्तान लष्कर संवेदनशील नियंत्रण रेषेवर तणाव कमी करणे आणि शांतता कायम राखण्यावर सहमत झाले.
{त्यााधी २०२० मध्ये एलओसीवर ५,१३३ वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन झाले.त्यात ४६ लोकांचा मृत्यू झाला.
{२८ जानेवारी, २०२१ पर्यंत एलओसीवर पाकने २९९ वेळा शस्त्रसंधी मोडली होती.
{२०१९ मध्ये ३४७९ शस्त्रसंधी तोडली. १२ लोक ठार १९ जवान शहीद झाले.

१० वर्षांमध्ये सर्वात कमी हौतात्म्य झाले
वर्ष नागरिक जवान अतिरेकी
मृत्यू शहीद खात्मा
2013 19 53 100
2014 28 47 114
2015 19 41 115
2016 14 88 165
2017 54 83 220
2018 86 95 271
2019 42 78 163
2020 33 56 232
2021 36 45 193
2022 30 30 193
स्रोत: एसएटीपी. आकड २८ डिसें.२२पर्यंतचे.

बातम्या आणखी आहेत...