आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • India Vaccination Updates: 85 Million Doses; India Set A World Record For The Highest Dose In A Single Day; News And Live Updates

तरुणाई जिंदाबाद!:भारतात एका दिवसात जगात सर्वाधिक डोसचा झाला विक्रम; याच वेगाने लसीकरण झाले तर 85 दिवसांत 70 टक्के लोक कव्हर होईल

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • रोज याच वेगाने डोस दिले तर फक्त 85 दिवसांत देशाची 70% लोकसंख्या कव्हर होऊ शकते
  • महाराष्ट्रात 18-44 वयोगटात सोमवारी एकूण 91,596 जणांनी लस घेतली

देशात सोमवारी रात्री १० वाजेपर्यंत ८५.१२ लाख लोकांनी लस घेतली. हा विश्वविक्रम आहे. कारण, आतापर्यंत जगातील कुठलाही देश एका दिवसात ५५ लाखांपेक्षा जास्त डोस देऊ शकला नाही. तथापि, चीन रोज दोन कोटी डोस देण्याचा दावा करतो, पण आंतरराष्ट्रीय समुदाय हा दावा खरा असल्याचे मानत नाही.

विशेष म्हणजे लस घेणाऱ्यांत ७४% म्हणजे ६१.३ लाख लोक १८ ते ४४ वयोगटाचे आहेत. देशात आतापर्यंत रोज सरासरी ३१ लाख डोस दिले जात होते. सोमवारी त्याच्या दुप्पट डोस फक्त तरुणांना देण्यात आले. डोसचा विक्रम करण्यात मध्य प्रदेश, कर्नाटक, यूपी, गुजरात आणि हरियाणा या भाजपशासित राज्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. या ५ राज्यांत एकूण ४४ लाख म्हणजे देशाच्या ५२% डोस दिले.

पंतप्रधान म्हणाले- वेलडन इंडिया!
विक्रमी लसीकरणाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, लसीकरण हे कोरोनाशी लढण्याचे सर्वात भक्कम शस्त्र आहे. देशवासीयांचे अभिनंदन. वेलडन इंडिया...!

लसीकरणाच्या मेगा शोमधील प्रमुख बाबी
७५% ना पहिला डोस

६३ लाख नव्या लोकांना सुरक्षा मिळाली. एका डोसमुळे संसर्गाचा धोका ८० % पर्यंत कमी होतो, असे अभ्यास सांगतात.

क्षमता-रोज सव्वा कोटी डोस शक्य
मप्रत प्रत्येक केंद्रावर सरासरी २०१ डोस दिले. म्हणजे देशात ६८ हजार केंद्रांवर सव्वा कोटी डोस शक्य.

मागास राज्यांत वेगाची अपेक्षा
डोस देण्यात मप्र, यूपी मागे होते. सोमवारी दोन्ही राज्ये टॉप-५ मध्ये राहिली. वेग कायम ठेवण्याचा दावाही केला.

फायझरशी अद्याप करार झाला नाही, लस आता ऑगस्टपर्यंत
जगात १५० पेक्षा जास्त देशांत सोमवारी योग दिन साजरा झाला. भारतातही विविध कार्यक्रम झाले. त्यासोबत भारतात डोसच्या विश्वविक्रमाचा योग झाला. भारताला फायझरच्या लसीसाठी ऑगस्टपर्यंत प्रतीक्षा करावी लागू शकते. फायझरच्या अमेरिकी सूत्रांनुसार, भारत सरकार व कंपनी यांच्यातील उत्तरदायित्वाच्या अटीबाबतची सहमती आतापर्यंत कागदावर उतरलेली नाही. लसीचा दुष्परिणाम झाल्यास आपली जबाबदारी राहू नये, अशी कंपनीची इच्छा आहे. भारत सरकार त्यासाठी एक महिन्यापूर्वीच राजी झाले होते. भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी यासंदर्भात अमेरिकेत फायझरच्या काही अधिकाऱ्यांची भेटही घेतली होती. पण या करारास विलंब होत असल्याचे आता दिसते.

फायझरच्या काही उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी ‘भास्कर’ला सांगितले की, कंपनी जुलैतच लस देण्यास तयार होती. पण भारत सरकारने आतापर्यंत कुठलाही लेखी प्रस्ताव दिलेला नाही. त्यामुळे आता ऑगस्टअखेर किंवा सप्टेंबरमध्येच भारताला लसीचा पुरवठा होऊ शकेल, तोही सरकारने तत्काळ काही निर्णय घेतला तर. त्याआधी मेमध्ये फायझरच्या अधिकाऱ्यांनी ‘भास्कर’ला सांगितले होते की, कंपनी जुलै ते ऑक्टोबरदरम्यान ५ ते ७ कोटी डोस भारताला पाठवेल. फायझरच्या एका महिला अधिकाऱ्याने सांगितले की,‘आम्ही मागण्या मान्य करण्यास तयार आहोत, असे भारत सरकारने मेच्या मध्यात आश्वासन दिले होते.

पण इतर देशांच्या तुलनेत भारताने प्रक्रिया पुढे नेण्यास खूप जास्त वेळ घेतला. ब्रिटनने फक्त तीन दिवसांत मंजुरी दिली होती. भारतात त्याला आता महिना होत आला आहे. त्याचा परिणाम पुरवठ्यावर होणे निश्चित आहे.’ आणखी एक अधिकारी म्हणाला की, आधीच खूप वेळ गेला आहे. कारण, केंद्र सरकारऐवजी राज्ये आमच्याशी थेट संपर्क करत होती. असे जगातील कुठल्याही देशात होत नव्हते. त्यामुळे खूपच विलंब झाला.

बातम्या आणखी आहेत...