आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • India Vaccination Updates: Central Government Said 225 Crore Dose Till December; News And Live Updates

रण लसीकरण:या महिन्यात 10, जुलैमध्ये 17 अन् सप्टेंबरमध्ये 42 कोटी डोस निर्मिती; डिसेंबरपर्यंत 225 कोटी डोस - केंद्र सरकारचा दावा

नवी दिल्ली14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • देशात लस उत्पादन जुलैत दुप्पट, सप्टेंबरमध्ये होईल चौपट
  • यामध्ये 70% हून अधिक लोकसंख्येला दोन्ही डोस मिळू शकतील

कोरोनाविरुद्ध लसीकरणाच्या मोहिमेला या महिन्यात गती मिळण्याची आशा फारच कमी आहे. तरी, पुढील महिन्यात परिस्थिती सुधारेल. लसनिर्मिती करणाऱ्या कंपन्यांच्या नवीन करारांचा आढावा घेता जूनमध्ये देशाला १० कोटी डोस मिळतील आणि सप्टेंबरपासून ४२ कोटी डोस मिळू लागतील. उत्पादन वाढवण्यासाठी भारत बायोटेकने (कोव्हॅक्सिन) तीन कंपन्यांशी करार केला आहे. शिवाय स्पुटनिक-व्ही लस तयार करण्यासाठी ७ कंपन्यांशी करार झालेला आहे. या कंपन्या कधी डोस पुरवतील याची माहिती केंद्राने जमा केली आहे.

या वर्षअखेरीस आणखी सहा कंपन्यांची लस मिळेल. देशभरात ६७ हजार लसीकरण केंद्रे आहेत. परंतु, लसीच्या तुटवड्यामुळे ६७ हजार केंद्रे आठवड्यात ३-४ दिवसच सुरू होती. राष्ट्रीय कोविड कृतिदलाचे प्रमुख डॉ. व्ही. के. पॉल यांच्यानुसार, पोलिओ लसीकरण मोहिम सुरू होते तेव्हा दिवसाला ८ कोटी डोस दिले जातात. देशात कोरोना लसही याच गतीने दिली जाऊ शकते.

बायोलॉजिकल-ई तीन कंपन्यांची लस तयार करत आहे, १० कोटी डोस अगोदरच तयार
बायोलॉजिकल-ई ही अशी एकमेव कंपनी आहे जी तीन कंपन्यांची लस तयार करत आहे. तिन्ही कंपन्यांशी तंत्रज्ञान हस्तांतरण करार झालेले आहेत. तिन्ही कंपन्या विदेशी आहेत. बायोलॉजिकल-ईच्या एमडी महिमा दातला यांनी याला पुष्टी दिली. दुसरीकडे, सूत्रांनुसार कंपनीने जॉन्सन अँड जॉन्सच्या लसीचे १० कोटी डोस अगोदरच तयार केले आहेत. मंजुरी मिळताच कंपनी हे डोस परदेशात पाठवेल. मात्र, यातील काही डाेस भारतात ठेवावेत म्हणून केंद्र सरकार सतत कंपनीशी चर्चा करत आहे.

बातम्या आणखी आहेत...