आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कार्तिकने लिटन दासला दिले 2 जीवदान:बांगलादेशाच्या ओपनरने तुफान सुरुवात केली; अवघ्या 22 चेंडूंतच केले अर्धशतक

स्पोर्ट्स डेस्क24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

टी-20 विश्वचषकाच्या सुपर-12 स्टेजमध्ये बुधवारी झालेल्या सामन्यात भारताने बांगलादेशाचा अवघ्या 5 धावांनी पराभव केला. भारताने 20 षटकांत 184 धावा केल्या. या टार्गेटचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या बांगलादेशाला सलामीवीर लिटन दासने पॉवरप्लेमध्ये जबरदस्त सुरुवात करवून दिली. संघाने अवघ्या 6 षटकांतच बिनबाद 60 धावा केल्या होत्या. त्यात भारतीय संघाचा यष्टीरक्षक दिनेश कार्तिकने दासला 2 जीवदान दिले. पण हे दोन्हीही फार अवघड चान्स होते.

पहिला झेल अर्शदीप सिंगच्या षटकात व दुसरा कॅच भुवनेशव्र कुमारच्या बॉलिंगवर सुटला. त्यावेळी दास अनुक्रमे 9 व 27 धावांवर खेळत होते. या जीवदानामुळे त्याने पॉवर प्लेमध्येच आपले अर्धशतक झळकावले.

कार्तिकच्या कॅचवर कन्फ्यूजन

भारताच्या डावाचे दुसरे षटक अर्शदीप सिंगने टाकले. ऑफ स्टंपबाहेर आउट स्विंग होणाऱ्या पुलर लेंथ बॉल लिटन दासच्या बॅटला चाटून मागे गेला. यष्टीमागे उभ्या कार्तिकने हा झेल पकडला. यामुळे सर्वच भारतीय खेळाडू आनंदोत्सव साजरा करू लागले.

पण ग्राउंड अंपायरने थर्ड अंपायरला कॅचची पडताळणी करण्याची सूचना केली. रिप्लेमध्ये बॉल कार्तिकच्या ग्लव्ह्जमध्ये येण्यापूर्वी जमिनीला स्पर्श करत असल्याचे दिसले. म्हणजे एक टप्पा खाल्यानंतर चेंडू कार्तिकच्या हातात विसावला. त्यावेळी दास 9 धावांवर खेळत होता.

कार्तिक डायविंग कॅच करण्यात अपयशी

डावाच्या तिसऱ्या षटकात दिनेश कार्तिकने डायविंग झेल सोडला. भुवनेश्वर कुमारने लिटन दासला ऑफ स्टंपच्या बाहेर शॉर्ट ऑफ गुड लेंथ बॉल टाकला. पुन्हा चेंडूने दासच्या बॅटला स्पर्श करून यष्ट्यांमागे गेला. लोकेश राहुल फर्स्ट व सेकेंड स्पिलच्या मध्यभागी उभा होता. बॉल त्याच्यापासून दूर होता. त्यामुळे कीपर कार्तिकने डाइव्ह लावला. पण त्याला चेंडूपर्यंत पोहचता आले नाही. यावेळी दास 27 धावांवर बॅटिंग करत होता.

लिटनचे 22 चेंडूंत अर्धशतक

बांगलादेशच्या ओपनरने पॉवरप्लेमध्ये मिळालेल्या या जीवदानाचा पुरेपुरा फायदा घेत अवघ्या 22 चेंडूंतच आपले अर्धशतक पूर्ण केले. पॉवरप्ले संपल्यानंतर लिटन 56 धावांवर खेळत होता. अखेरीस पावसानंतर लोकेश राहुलच्या जबरदस्त थ्रोमुळे तो 27 चेंडूंत 60 धावा ठोकून धावबाद झाला.

पावसामुळे भारतावर होते पराभवाचे सावट

बांगलादेशाने 7 षटकांत 66 धावा कुटल्या होत्या. लिटन दास 26 चेंडूंत 59 व नजमूल हसन सेंटो 7 धावांवर खेळत होते. तेव्हा पाऊस सुरू झाला. DLS मेथडच्या हिशोबाने स्कोअर 49 हवा होता. पण बांगलादेशाने त्याहून 17 धावा जास्त केल्या होत्या.

पावसामुळे डकवर्थ-लुईस-स्मिथ (DLS) मेथडमुळेच सामन्याचा निकाल द्यावा लागणार होता. पण सुदैवाने पाऊस थांबला व सामना पुन्हा सुरू झाला. पावसामुळे सामन्यांची काही षटके कमी करण्यात आली. डीएलएस मेथडनुसार बांगलादेशाला 16 षटकांत 151 धावांचे सुधारित आव्हान मिळाले. पण भारताने अचूक गोलंदाजीमुळे त्याला 145 धावांवरच रोखले. अशा प्रकारे भारताने बांगलादेशाचा अवघ्या 5 धावांनी पराभव केला.

7 षटकांनंतर एडिलेडध्ये मुसळधार पाऊस सुरू झाला. पण तो थांबल्यानंतर सामना पुन्हा सुरू झाला.
7 षटकांनंतर एडिलेडध्ये मुसळधार पाऊस सुरू झाला. पण तो थांबल्यानंतर सामना पुन्हा सुरू झाला.
बातम्या आणखी आहेत...