आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • India Vs China | Military Budget Of China India | Know How Many Labor Force Are In China, China Defence Heatlh Education Vs India Budget Comparison

भारत v/s चीन:चीनचे बजेट 8 पट तर जीडीपी 7 पट जास्त; चीनमध्ये 135.56 कोटी तर भारतामध्ये 76.36 कोटी लोक साक्षर

नवी दिल्ली2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारत आणि चीन, लोकसंख्येच्या बाबतीत दोन्ही देश सर्वात मोठे आहेत. दोन्ही देश एकमेकांचे शेजारीदेखील आहेत. बांग्लादेशनंतर चीनसोबत भारताची सर्वात लांब सीमा जोडली गेली आहे. बांग्लादेश आणि भारतादरम्यान, 4 हजार 96 किमी लांब सीमा आहे आणि चीनसोबत साथ 3 हजार 488 किमी लांब.

दोन्ही देशांमध्ये मागील दोन महिन्यांपासून सीमेवर तणाव सुरू आहे. परंतू, हा तणाव काही नवीन नाही. देश स्वतंत्र झाल्यापासून दोन्ही देशांमध्ये सीमेवरुन वाद सुरू आहे. भारत-चीनमध्ये 1962 एक युद्धदेखील झाले आहे. परंतू, त्या युद्धात आपल्या हातून अक्साई चीन निघून गेले.

भारत 1947 मध्ये स्वतंत्र झाला आणि चीनमध्ये 1949 पासून कम्युनिस्ट पार्टीची सरकार आहे. एक वेळ अशी होती, जेव्हा भारत आणि चीनच्या जीडीपीमध्ये जास्त अंतर नव्हते. 1980 मध्ये भारताचा जीडीपी 186 अब्ज डॉलर तर चीनचा 191 अब्ज डॉलर होता. पण, आज जीडीपीच्या बाबतीत चीन दुसऱ्या नंबरवर आहे आणि भारत 5 व्या. दोन्ही देशांमध्ये जीडीपीच्या बाबतीत 7 पट अंतर आले आहे.

फक्त जीडीपीच नाही, तर अजून अनेक बाबींमध्ये चीन आज आपल्या पुढे आहे. याचे एक कारण हे असू शकते की, चीनने आपल्या देशातील नागरिकांचा पुरेपुर फायदा करून घेतला आणि आजही आपल्या देशात अनेकजण बेरोजगार आहेत. 

5 पॅरामीटर, जे भारत-चीनमधील अंतर सांगतील

1. एरिया : चीन आपल्यापेक्षा तीनपट मोठा

जगातील सर्वात मोठा देश रशिया आहे, 1.70 कोटी चौरस किमीपेक्षा जास्त एरियात पसरला आहे. दुसरा कॅनडा आणि तिसरा नंबर चीनचा आहे. चीचे क्षेत्रपळ 95.96 लाख चौरस किमी आहे. त्यानंतर अमेरिका, ब्राझील आणि ऑस्ट्रेलिया आहेत. या यादीत भारताचा नंबर सातवा आहे. भारताचे क्षेत्रपळ 32.87 लाख चौरस किमी आहे. या हिशोबाने चीन आपल्यापेक्षा तीन पट मोठा आहे.

2. लोकसंख्या : चीनमध्ये 97% लोक साक्षर

भारत आणि चीनच्या लोकसंख्येत आता जास्त अंतर उरले नाही. चीनची लोकसंख्या 139.27 कोटी तर भारताची 138.72 कोटी झाली आहे. दोन्ही देशात पुरुष-महिलांच्या बाबतीत थोडे अंतर आहे. परंतू, साक्षर आणि निरक्षरांच्या बाबतीत दोन्ही देशात मोठे अंतर आहे.

चीनच्या एकूण लोकसंख्येपैकी 135.56 कोटी लोक साक्षर आहेत, तर भारतातील 76.36 कोटी लोक साक्षर आहेत. भारतात 34% नागरिक निरक्षर तर चीनमध्ये तीन टक्क्यांच्या आसपास लोक निरक्षर आहेत.

3. जीडीपी : चीनची जीडीपी 7 पट ज्यास्त

आकडेवारीनुसार, चीनची जीडीपी 13 ट्रिलियन डॉलर, म्हणजेच 1 हजार 15 लाख कोटी रुपये आहे. तर, भारताची जीडीपी 147.79 लाख कोटी रुपये आहे. फक्त जीडीपीच नाही, तर कॅपिटा इनकममध्ये चीन आपल्यापेक्षा तीन पट मोठा आहे.

चीनच्या लोकांची कॅपिटा इनकम 30 हजार 733 युआन, म्हणजेच 3.28 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे. परंतू, भारतात प्रत्येक व्यक्तीची सरासरी वार्षीक इनकम 1.35 लाख रुपये आहे. याशिवाय भारतावर डिसेंबर 2019 पर्यंत 40.18 लाख कोटींपेक्षा जास्तीचे कर्ज आहे. तर, सप्टेंबर  2019 पर्यंत चीनवर 15 हजार 200 कर्ज होते.

4. बजेट : चीनचे बजट 8 पट जास्त

भारताचे बजेट 30.42 लाख कोटी आणि चीनचे 258.40 लाख कोटी रुपये आहे. चीनचे बजेट भारतापेक्षा 8 पट जास्त आहे. यासोबतच डिफेंस, एजुकेशन आणि हेल्थ बजेटमध्येही चीन आपल्यापेक्षा पुढे आहे.

5. लेबर फोर्स : चीनकडे आपल्यापेक्षा दुप्पट कामगार

भारतात 2017-18 मध्ये बेरोजगारी दर 6.1% झाला होता.  हा 45 वर्षातील सर्वात कमी आहे. तर, चीनमध्ये बेरोजगारी दर 3.6% आहे. 2011 च्या जनगणनेनुसार, भारताकडे 36.25 कोटींची लेबर फोर्स आहे आणि चीनकडे 2019 पर्यंत 78.08 कोटींची लेबर फोर्स होती.

(सोर्स : वर्ल्ड बँक, मॅक्रोट्रेंड्स, लोकसभा, MOSPI, नॅशनल ब्यूरो ऑफ स्टेटिस्टिक्स (चीन), पीआयबी, इकोनॉमिक सर्वे, censusindia.gov.in, worldometers, शिन्हुआ न्यूज एजेंसी (चीन), बजट डॉक्यूमेंट्स, मीडिया रिपोर्ट्स, गूगल रिसर्च)

बातम्या आणखी आहेत...