आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चीन सीमेवर तैनात होणार प्रलय क्षेपणास्त्र:150 ते 500 किमीपर्यंत करू शकते अचूक मारा, रात्रीही हल्ला करण्यास सक्षम

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

चीनसोबत सुरू असलेल्या सीमावादाच्या पार्श्वभूमीवर भारतीय लष्कर प्रथमच सामरिक कारवाईसाठी बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांचा समावेश करणार आहे. वृत्तसंस्थेनुसार, लष्कराने LAC वर प्रलय बॅलिस्टिक क्षेपणास्त्र तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे. हे क्षेपणास्त्र 150 ते 500 किलोमीटरपर्यंतचे आपले लक्ष्य अचूकपणे भेदू शकते.

डिसेंबर 2021 मध्ये या क्षेपणास्त्राची सलग दोन दिवसांत दोनदा यशस्वी चाचणी घेण्यात आली होती. तेव्हापासून भारतीय लष्कर त्याचे अधिग्रहण आणि समावेश करण्याच्या दिशेने काम करत आहे.

भारत-चीन सीमेवर या क्षेपणास्त्राच्या तैनातीची प्रक्रिया सुरू झाली आहे. पुढील आठवड्यात होणाऱ्या उच्चस्तरीय बैठकीत त्यास मान्यता मिळण्याची शक्यता आहे. भारताच्या तिन्ही सेना सध्या रॉकेट फोर्स बनवण्याच्या प्रयत्नात आहेत. अशा परिस्थितीत प्रलय क्षेपणास्त्राची तैनाती लवकरच शक्य आहे.

जमिनीवरून जमिनीवर मार करण्यास सक्षम

नुकतेच नौदल प्रमुख अॅडमिरल आर. के. हरि कुमार म्हणाले होते की, दिवंगत जनरल बिपिन रावत रॉकेट फोर्स तयार करण्याचे काम करत होते. जेणेकरून सीमेवर शत्रूचा मुकाबला करता येईल. प्रलय क्षेपणास्त्र सॉलिड प्रोपेलंट रॉकेट मोटारने सुसज्ज आहे. सोबतच नवीन तंत्रज्ञानही आहे. क्षेपणास्त्राच्या गाइडन्स सिस्टिममध्ये स्टेट ऑफ द आर्ट नेव्हिगेशन आणि इंटिग्रेटेड एव्हिओनिक्स आहे. प्रलय हे जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे क्षेपणास्त्र आहे.

रात्रीदेखील हल्ला करण्यास सक्षम

DRDO ने अद्याप प्रलयच्या वेगाचा खुलासा केलेला नाही. मात्र, मीडिया रिपोर्ट्सनुसार हे क्षेपणास्त्र रात्रीच्या वेळीही शत्रूंना लक्ष्य करण्यास सक्षम आहे. जर आपण शेजारील देशांबद्दल बोललो तर चीनकडे या पातळीचे डोंगफेंग 12 क्षेपणास्त्र आहे. तर पाकिस्तानकडे गझनवी, एम-11 आणि शाहीन क्षेपणास्त्रे आहेत. गझनवी, एम-11 पाकिस्तानला चीनकडून मिळाले आहे. गझनवी 320 किमी, एम-11 350 किमी आणि शाहीन 750 किमी अंतराची क्षेपणास्त्रे आहेत.

चिनी क्षेपणास्त्रांच्या तोडीचे आहे प्रलय

विविध मीडिया रिपोर्ट्सनुसार, 2015 पासूनच प्रलयच्या निर्मितीची चर्चा सुरू होती. डीआरडीओने आपल्या वार्षिक अहवालात या क्षेपणास्त्राचा उल्लेख केला होता. या क्षेपणास्त्राच्या अचूकतेमुळे ते चीनच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचा मुकाबला करण्यास पूर्णपणे सक्षम ठरते. ते जमिनीवरून तसेच कनेस्टरमधूनही डागले जाऊ शकते. प्रलय क्षेपणास्त्र हे इतर कमी पल्ल्याच्या बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांपेक्षा जास्त प्राणघातक असल्याचे सांगितले जात आहे.

बातम्या आणखी आहेत...