आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मोदींचे क्रिकेट प्रेम:तामिळनाडू दौऱ्यावर गेलेल्या मोदींनी विमानातून चेपक स्टेडियमचा घेतला फोटो, म्हणाले - 'इंट्रेस्टिंग कसोटी सामन्याचे दृष्य'

चैन्नई20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सोशल डीस्टेंसिंवर निगरानी ठेवण्यासाठी लावले आहेत CCTV कॅमरे

चेन्नईच्या चेपक स्टेडियममध्ये भारत आणि इंग्लंडमध्ये मालिका सामना सुरू आहे. कोरोना काळात पहिल्यांदा क्रिकेट पाहण्यासाठी स्टेडियममध्ये दर्श पोहचोले आहेत. मात्र रविवारी या टेस्टला एक विशेष प्रेक्षक मिळाले. खरेतर पंतप्रधान मोदी रविवारी तामिळनाडूच्या दौऱ्यावर होते. त्यांचा चैन्नईमध्ये कार्यक्रम होता. जेव्हा मोदी विमानाने चेन्नईहून केरळला रवाना होत होते. तेव्हा त्यांनी चेपक स्टेडियमचा फोटो घेतला. मोदींनी चेपकचा एरियल व्ह्यू आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला. त्यांनी लिहिले - 'इंट्रेस्टिंग टेस्ट मॅचचा हवाई नजारा पाहायला मिळाला'

चिमुकल्या चाहतीने पहिल्यांदा स्टेडियमवर जाऊन बघितला सामना

सामन्याच्या दुसऱ्या दिवशी स्टेडियमवर पोहोचलेल्या अनेक चाहत्यांनीही फोटोंच्या माध्यमातून क्रिकेटसोबतची आपली आवड शेअर केली. एक चिमुकली चाहती पहिला सामना पाहण्यासाठी पोहोचली. या दरम्यान सचिन तेंडुलकर आणि भारतीय संघाचे चाहते सुधीरही पोहोचले. चिमुकल्या चाहतीने एक प्ले-कार्ड दाखवत सांगितले की, हा तिच्या आयुष्यातील पहिला सामना आहे. ती पहिल्यांदा मॅच पाहण्यासाठी स्टेडियमध्ये पोहोचली आहे.

स्टेडियममध्ये 50% चाहत्यांना प्रवेश
खरेतर कोरोना काळात लॉकडाऊननंतर पहिल्यांदा देशात क्रिकेट स्टेडियममध्ये 50% क्रिकेट प्रेमींना प्रवेश देण्यात आला आहे. स्टेडियममध्ये प्रवेशासाठी 17 गेट आहेत. सर्वांचे तापमान तपासण्यात आले. स्टेडियममध्ये मेडिकल आणि आयसोलेशन रुमही बनवण्यात आले आहेत.

सोशल डीस्टेंसिंवर निगरानी ठेवण्यासाठी लावले आहेत CCTV कॅमरे
सोशल डिस्टेंसिंगवर नजर ठेवण्यासाठी CCTV कॅमेरेही लावण्यात आले आहेत. प्रेक्षक स्टेडियममध्ये केवळ मोबाइल घेऊन जाऊ शकतील. स्टँड्समध्ये चेंडू गेल्यानंतर अंपायर चेंडीला सॅनिटाइज करतील. सर्वांना मास्क घालणे अनिवार्य असणार आहे. ग्राउंडच्या चारही बाजूंनी मेडिकल टीम उपस्थित असेल. 4 रुग्णवाहिकांची सुविधा असेल. स्टेडियममध्ये मेडिकल रुम आणि आयसोलेशन रुमही असेल.

बातम्या आणखी आहेत...