आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारत-इंग्लंड मॅचचे टॉप मोमेंट्स:रोहितच्या डोळ्यात अश्रू, किंग कोहली कोसळला, हार्दिकमुळे झाली 39 वर्ष जुन्या शॉटची आठवण

स्पोर्ट्स डेस्क5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

टी-20 विश्वचषकाच्या दुसऱ्या सेमीफायनलध्ये इंग्लंडने भारताचा 10 गडी राखून दारुन पराभव केला. इंग्लंडच्या जोस बटलरने 80, तर एलेक्स हेल्सने 86 धावांची नाबाद दिमाखदार खेळी खेळली.

तत्पूर्वी, टीम इंडियाने टॉस गमावून प्रथम फलंदाजी करताना 6 गडी गमावून 168 धावा केल्या. हार्दिक पंड्या व विराट कोहली या इनिंगचे हिरो ठरले. पंड्याने 33 चेंडूंत धडाकेबाज 63 धावा कुटल्या. तर विराटने 40 चेंडूंत 50 धावा केल्या. या सामन्यातील काही संस्मरणीय क्षण आम्ही तुम्हाला या बातमीत सांगत आहोत.

दारुन पराभवानंतर रोहितच्या डोळ्यात अश्रू...

सेमीफायनलमध्ये इंग्लंडने धूळ चारल्यानंतर भारतीय कर्णधार रोहित शर्मा निराश व हताश दिसला. सामन्यानंतर रोहितने बराच वेळ प्रशिक्षक राहुल द्रविडशी चर्चा केली. त्यानंतर रोहित आपले डोळे पुसताना दिसून आला. त्याला कोच द्रविडने सांभाळले. माजी कर्णधार विराट कोहलीही सामन्यानंतर निराश दिसून आला. कोहली या स्पर्धेतील सर्वाधिक धावा काढणारा खेळाडू आहे. त्याने या टूर्नामेंटमधील 6 सामन्यांत 296 धावा काढल्या आहेत.

इंग्लंडविरोधात पराभव पत्करावा लागल्यामुळे रोहित शर्मा भावूक झाला.
इंग्लंडविरोधात पराभव पत्करावा लागल्यामुळे रोहित शर्मा भावूक झाला.

हेल्स-बटलरमुळे भारतीय चाहत्यांची निराशा

भारताने दिलेले 169 धावांचे टार्गेट इंग्लंडने 16 व्या षटकांतच पूर्ण केले. त्याचे सलामीवीर एलेक्स हेल्स व जोस बटलरने नाबाद 170 धावांची भागीदारी केली. भारतीय गोलंदाजांना संपूर्ण सामन्यात एकही बळी मिळाला नाही. 10 गड्यांनी विजय मिळवून इंग्लंड टी-20 विश्वचषकाच्या फायनलमध्ये पोहोचला आहे. तर भारतीय संघ पुन्हा एकदा मोठ्या सामन्यात ढेपाळला आहे.

इंग्लंडच्या जोस बटलर व एलेक्स हेल्स यांनी 170 धावांची नाबाद भागीदारी केली.
इंग्लंडच्या जोस बटलर व एलेक्स हेल्स यांनी 170 धावांची नाबाद भागीदारी केली.

हार्दिकमुळे 39 वर्ष जुन्या शॉटची आठवण

1983 च्या विश्वचषकाचे सेमीफायनल भारत-इंग्लंडमध्ये खेळले गेले होते. त्या सामन्यात यशपाल शर्माने बॉब विलिसच्या चेंडूवर एका वेगळ्या अंदाजाच षटकार ठोकला होता. तसाच उत्तुंग षटकार हार्दिकने क्रिस जॉर्डनच्या लेग स्टंपकडे जाणाऱ्या यॉर्कर लेंथच्या बॉलवर मारला. वेगवान गोलंदाजाचा मारा परतावून लावण्यासाठी पंड्या अक्रॉस उभा झाला. जॉर्डन त्याच्या जाळ्यात अडकला. त्याने लेग स्टंपवर ताशी 142 किमीच्या वेगाने यॉर्कर लेंथ बॉल टाकला. हार्दिकने तो चेंडू ‘फ्लिक ऑफ द रिस्ट’ केला. परिणामी, चेंडू हवेत झेपावत फाइन लेग बाउंड्रीच्या सीमेरेषेपार गेला.

इंग्लंडच्या क्रिस जॉर्डनला फ्लिक शॉट मारताना हार्दिक पंड्या.
इंग्लंडच्या क्रिस जॉर्डनला फ्लिक शॉट मारताना हार्दिक पंड्या.

पंतने स्वतःचा विकेट फेकला

शेवटच्या षटकात पंतला ख्रिस जॉर्डनच्या यॉर्करचा सामना करता आला नाही. त्याचे संतुलनही बिघडले. हार्दिक दुसऱ्या टोकाकडून त्याच्यापर्यंत पोहोचला होता. पंत क्रीजवर पडला. पण त्याला हार्दिक पेटल्याचे ठावूक होते. त्यामुळे त्याने नॉन स्ट्रायकर एंडच्या दिशेने धाव घेऊन धावबाद होणे पसंत केले. त्यानंतर हार्दिकने इंग्लंडच्या गोलंदाजांची अक्षरशः पिसे काढली.

हार्दिक पंड्यासाठी स्वतःचा विकेट फेकताना ऋषभ पंत.
हार्दिक पंड्यासाठी स्वतःचा विकेट फेकताना ऋषभ पंत.

कोहली प्रथमच गुडघ्यावर

16व्या षटकात विराट कोहलीला ख्रिस जॉर्डनचा यॉर्कर मिड-विकेटच्या दिशेने खेळायचा होता. चेंडूचा वेग ताशी 144 किलोमीटर होता. कोहलीचा तोल गेला आणि तो क्रिजवर कोसळला. अंपायरने नाबाद घोषित केले. पण इंग्लिश संघाने रिव्ह्यू घेतला. मात्र, तिसऱ्या पंचाने 'अंपायरच्या कॉल'वर शिक्कामोर्तब केल्यामुळे कोहली बचावला. पुढच्याच चेंडूवर विराटने क्लासिक कव्हर ड्राइव्ह करत 4 धावा वसूल केल्या.

क्रिस जॉर्डनच्या यॉर्करवर विराट कोहली असा पडला.
क्रिस जॉर्डनच्या यॉर्करवर विराट कोहली असा पडला.

हार्दिकच्या डावाचा दुखद शेवट

टीम इंडियाच्या डावातील शेवटच्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर हार्दिकने मिड-विकेटवर चौकार मारला. पण त्याच चेंडूवर तोही बाद झाला. पण कसे? त्याचे झाले असे की, जॉर्डनने हलका यॉर्कर टाकला. पंड्याने क्रीजच्या खोलीचा वापर करत चौकार ठोकला. पण, क्रीजची डेप्थ गाठताना त्याचा पाय यष्ट्यांवर आदळला. त्यामुळे तो हिट विकेट ठरला.

हार्दिक पंड्या पहिल्या डावाच्या शेवटच्या चेंडूवर हिट विकेट झाला.
हार्दिक पंड्या पहिल्या डावाच्या शेवटच्या चेंडूवर हिट विकेट झाला.

पंड्याचे लेडी लक

या सामन्यासाठी हार्दिकची पत्नी नताशा अॅडलेडमधील व्हीव्हीआयपी स्टँडवर उपस्थित होती. त्याच्या प्रत्येक शॉटवर ती आनंदाने नाचत होती. हार्दिकने शॉट खेळल्यानंतर टीव्ही कॅमेरा वारंवार काळे जॅकेट व निळ्या डेनिमसह काळा गॉगल घातलेली नताशा दाखवत होता. पंड्यानेही जबरदस्त खेळी करत आज लक व लेडी आपल्यासोबत असल्याचे सिद्ध केले.

भारत-इंग्लंड सामना पाहण्यासाठी हार्दिक पंड्याची पत्नी नताशा स्टेनकोविचही पोहोचली होती.
भारत-इंग्लंड सामना पाहण्यासाठी हार्दिक पंड्याची पत्नी नताशा स्टेनकोविचही पोहोचली होती.

हार्दिकसाठी धोनीच्या धर्तीवर फील्डिंग

इंग्लंडचे 15 वे षटक लियाम लिव्हिंगस्टोने टाकले. त्याच्या दुसऱ्याच चेंडूवर हार्दिक पंड्याने चौकार ठोकला. या चौकारानंतर कर्णधार जोस बटलरने आदिल रशीदला बॉलरच्या बरोबर मागे उभे केले. IPLमध्ये चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्र सिंह धोनी कधी कधी अशा प्रकारची फील्डिंग लावतो. विशेषतः मुंबई इंडियंसचा धडाकेबाज फलंदाज कायरन पोलार्डविरोधात. विश्वचषकाच्या सेमीफायनलमध्येही याच प्रकारची फील्डिंग पोजिशन दिसून आली.

रोहितला जीवदान

पाचव्या षटकाचा दुसरा चेंडू. गोलंदात सॅम करन व स्ट्राइकवर भारतीय कर्णधार रोहित शर्मा. सॅमच्या फुलर लेंथ चेंडूवर रोहितने मिड विकेटवरून शॉट खेळला. चेंडू सीमारेषेपार गेला. हा रोहितचा पहिला चौकार होता. पुढील बॅक ऑफ लेंथ चेडू रोहितने पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला. बॉल समजताच त्याने तो मिड विकेटच्या लेफ्ट साइडला पुल केला. हा रोहितचा दुसरा चौकार होता.

षटकाच्या चौथा चेंडू, रोहित पुन्हा शॉट मारण्याच्या प्रयत्नांत होता. सॅमच्या ऑफ स्टंप बाहेरच्या लेंथ बॉलला रोहितने कट केले. चेंडू बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने हवेत गेला. हॅरी ब्रूकने डाइव्ह मारला अन् चेंडू त्याच्या हातात. पण रोहितला नशिबाने साथ दिली. कारण चेंडूने ब्रूकच्या हातातून जमिनीला स्पर्श केला होता. त्यावेळी रोहित 14 धावांवर खेळत होता. त्यानंतर रोहित 9 व्या षटकाच्या 5 व्या चेंडूवर 27 धावा काढून बाद झाला.

बातम्या आणखी आहेत...