आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापाकचे भारताविरोधातील आणखी एक कारस्थान उजेडात आले आहे. भारतीय गुप्तचर यंत्रणांच्या माहितीनुसार, पाकने आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचा निषेध करण्याची योजना आखली आहे. त्यानुसार, पाकने आपल्या जगभरातील दूतावासांना भारताची प्रतिमा मलीन करण्यासाठी काश्मीरच्या मुद्यावर निदर्शने करण्याची सूचना केली आहे.
इंडिया टुडेने गुप्तचर यंत्रणांचा दाखला देत म्हटले आहे की, पाक परराष्ट्र मंत्रालयाने त्यांच्या सर्व दूतावासांना एक गुप्त नोट पाठवली आहे. त्यात भारताविरुद्ध कट रचण्याची संपूर्ण माहिती देण्यात आली आहे. पाक 5 फेब्रुवारी रोजी 'काश्मीर एकता दिन' साजरा करतो. त्यामुळे इस्लामाबादच्या पाक उच्चायुक्ताने सर्व दूतावासांना फॅक्स व ईमेल पाठवून भारतीय लष्कराची बदनामी करण्याच्या योजनेचा तपशील सांगितला आहे.
काश्मीर एकता दिन म्हणजे काय?
पाकिस्तानच्या माहितीनुसार, भारताचा काश्मीरवर बेकायदा कब्जा आहे. भारतीय लष्कर तिथे अन्याय अत्याचार करत आहे. याच्या निषेधार्थ पाकिस्तान दरवर्षी 5 फेब्रुवारी रोजी काश्मीर एकता दिन साजरा करतो.
शुक्रवारी जैश-ए-मोहम्मदच्या 6 अतिरेक्यांना बेड्या
जम्मू-काश्मीर पोलिस व लष्कराने शुक्रवारी संयुक्तपणे प्रतिबंधित दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदच्या 6 अतिरेक्यांच्या मुसक्या आवळल्या. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात दारूगोळा जप्त करण्यात आला आहे.
लष्कर व पोलिसांच्या प्राथमिक तपासात हे अतिरेकी सोशल मीडिया साइट्सच्या माध्यमातून सीमेपलीकडील त्यांच्या हँडलर्सच्या संपर्कात असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यांचा कुलगाम जिल्ह्यात ग्रेनेड हल्ला करण्याचा डाव होता. तेथील नागरिकांना धमकावून परिसरातील शांतता भंग करण्याचाही त्यांचा उद्देश होता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.