आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • India Vs Russia Ukraine Tension; Air India Flight Leaves For Ukraine To Bring Back Indians

रशिया-यूक्रेन तणावावर भारताची भूमिका:एयर इंडियाची स्पेशल फ्लाइट यूक्रेनमध्ये रवाना, भारताने UN मध्ये सांगितले - तिथे आमचे 20 हजार नागरिक, त्यांच्या सुरक्षेला प्राधान्य

नवी दिल्ली6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

रशियाने युक्रेनचे दोन प्रांत स्वतंत्र देश म्हणून घोषित केले आहेत. रशियाच्या या निर्णयावर भारताने चिंता व्यक्त केली आहे. युनायटेड नेशन्स सिक्युरिटी कौन्सिलमधील भारताचे प्रतिनिधी टीएस तिरुमूर्ती यांनी सांगितले की, युक्रेन आणि त्याच्या सीमावर्ती भागात विद्यार्थ्यांसह 20,000 अधिक भारतीय राहतात. या भारतीयांच्या सुरक्षेला आमचे प्राधान्य असल्याचे तिरुमूर्ती यांनी सांगितले.

दरम्यान, एयर इंडियाचे विशेष विमान मंगळवारी सकाळी युक्रेनला रवाना झाले आहे. एएनआय वृत्तसंस्थेनुसार, एयर इंडियाचे फ्लाइट ड्रीमलाइनर B-787 युक्रेनला पाठवण्यात आली आहे. त्याची क्षमता 200 प्रवाशांची आहे. हे विमान मंगळवारी रात्रीच भारतात परतणार आहे. रशिया आणि युक्रेनमधील तणावा दरम्यान भारताने आधीच तिथून आपल्या नागरिकांना परत आणण्यासाठी विशेष फ्लाइट्स जाहीर केल्या होत्या. 22 फेब्रुवारी व्यतिरिक्त 24 आणि 26 फेब्रुवारीला ही उड्डाणे ऑपरेट केली जाणार आहेत.

भारताने दोन्ही पक्षांना संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे
रशिया-युक्रेन तणावावर यूएनमध्ये भारताचा स्टँड टीएस तिरुमूर्ती म्हणाले, 'युक्रेन आणि रशिया यांच्यातील सीमेवरील तणाव ही गंभीर चिंतेची बाब आहे. रशियाच्या या भागातल्या हालचालींमुळे शांतता आणि सुरक्षितता बिघडेल. आम्ही दोन्ही पक्षांना संयम बाळगण्याचे आवाहन करतो. आमचा विश्वास आहे की हा प्रश्न केवळ आणि केवळ राजनैतिक संवादातून सोडवला जाऊ शकतो. तणाव निवळण्यासाठी जी काही पावले उचलली गेली आहेत, त्यासाठी आपल्याला थोडा वेळ देखील द्यावा लागेल.'

ते म्हणाले, 'सर्व पक्षांनी आंतरराष्ट्रीय सुरक्षा आणि शांतता राखली पाहिजे. हा तणाव लवकरात लवकर सोडवला गेला पाहिजे, जो सर्व पक्षांना मान्य असेल. राजनैतिक प्रयत्न त्वरित वाढवणे आवश्यक आहे.'

बातम्या आणखी आहेत...