आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • India Vs West Indies | Marathi News | T20 Match | At Home, India Set Their Sights On A Series winning Six; The Second T20 Match Today, The Evening Of The Launch. From 7 P.m.

भारत वेस्ट इंडीज:घरच्या मैदानावर भारताची नजर मालिका विजयाच्या षटकारावर; दुसरा टी-20 सामना आज, प्रक्षेपण संध्या. 7 वाजेपासून

काेलकाता6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • भारताची मालिकेत आघाडी; विंडीजसाठी निर्णायक लढत

सलामी विजयाने फाॅर्मात असलेला यजमान भारतीय संघ आता घरच्या मैदानावर मालिका विजयाचा षटकार मारण्यासाठी सज्ज झाला आहे. टीम इंडियाला आता पाहुण्या विंडीजविरुद्धची सलग दुसरी मालिका आपल्या नावे करण्याची संधी आहे. भारत आणि विंडीज यांच्यात शुक्रवारी मालिकेतील दुसरा टी-२० सामना रंगणार आहे. याच ईडन गार्डन मैदानावर टीम इंडियाने विजयी सलामी देत तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे. आता विंडीज संघासाठी मालिकेतील दुसरा सामना निर्णायक आहे.

भारतीय संघाला दुसरा सामना जिंकून घरच्या मैदानावर सलग सहावी मालिका आपल्या नावे करता येईल. भारतीय संघाने फेब्रुवारी २०१९ मध्ये घरच्या मैदानावर टी-२० मालिका गमावली हाेती. यादरम्यान पाहुण्या ऑस्ट्रेलियाने दाैऱ्यावर भारतविरुद्धची दाेन टी-२० सामन्यांची मालिका २-० ने जिंकली हाेती.

सलग पाच मालिका आपल्या नावे :
भारतीय संघाने फेब्रुवारी २०१९ नंतर घरच्या मैदानावर सहा मालिका खेळल्या आहेत. यात सलग पाच मालिका आपल्या नावे केल्या आहेत. तसेच एक मालिका १-१ ने ड्राॅ झाली हाेती. आता मालिका विजयासाठी टीम इंडियाने कंबर कसली आहे.

विंडीजविरुद्ध विजयी हॅट‌्ट्रिकची संधी :

भारतीय संघाला आपल्या घरच्या ऐतिहासिक ईडन गार्डन मैदानावर पाहुण्या विंडीजविरुद्ध विजयी हॅट‌्ट्रिक साजरी करण्याची संधी आहे. भारताने यापूर्वी या मैदानावरील दाेन सामन्यांत विंडीजला धूळ चारली. भारताने या दाेन्ही टी-२० सामन्यांत विजयी पताका फडकवली. आता सलग तिसरा विजय संपादन करण्यावर टीम इंडियाची नजर लागली आहे.

श्रेयसकडून उल्लेखनीय कामगिरीची आशा : राेहित
युवा खेळाडू श्रेयस अय्यरकडून आता संघ व्यवस्थापकांना अष्टपैलू कामगिरीची आशा आहे. त्याला सलामी सामन्यात संधी मिळाली नव्हती. त्याच्यामध्ये सर्वाेत्तम कामगिरी करण्याची प्रचंड क्षमता आहे. त्याची सत्रातील कामगिरी ही लक्षवेधी ठरलेली आहे. याचा संघाला निश्चित असा फायदा हाेईल, असा विश्वास कर्णधार राेहित शर्माने व्यक्त केला. त्याच्याकडे आम्ही विश्वचषकादरम्यान तरबेज असा अष्टपैलू खेळाडू म्हणून पाहत आहोत, असेही त्याने सांगितले.

बातम्या आणखी आहेत...