आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सूर्याच्या 244च्या स्ट्राइक रेटने धावा:राहुलचे टी-20 विश्वचषकातील सलग दुसरे अर्धशतक, त्यानंतर गोलंदाजांनी केले काम फत्ते

स्पोर्ट्स डेस्क23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

टीम इंडियाने रविवारी झिम्बाब्वेला पराभूत करून टी-20 विश्वचषकातील सेमीफायनलमधील आपली जागा पक्की केली. भारतीय संघ सुपर-12 च्या ग्रुप-2मधील आपले अव्वल स्थान राखत दिमाखात अंतिम 4 संघात पोहोचला. भारताने या सामन्यात 13.3 षटकांपर्यंत 101 धावांवर 4 गडी गमावले होते. पण येथून पुढे घडलेल्या 5 फॅक्टर्समुळे भारतीय संघाने सामना सहजपणे जिंकला. चला तर मग जाणून घेऊया हे फॅक्टर्स...

1. के एल राहुलचे सलग दुसरे अर्धशतक

भारताची सुरुवात चांगली झाली नाही. कर्णधार रोहित शर्मा 13 चेंडूत 15 धावा करून बाद झाला. त्यानंतर दुसरा सलामीवीर के एल राहुलने धडाकेबाज फलंदाजी केली. त्याने 35 चेंडूंत 3 चौकार व 3 षटकारांच्या मदतीने 51 धावा केल्या. त्याचा स्ट्राइक रेट 145.71 राहिला. राहुलचे विश्वचषकातील हे सलग दुसरे अर्धशतक आहे. तत्पूर्वीच्या 3 सामन्यांत तो सुपर फ्लॉप ठरला होता.

2. राहुल-विराटची भागीदारी

विराट कोहली या सामन्यात 26 धावांवर बाद झाला. त्याचा स्ट्राइक रेटही 104 होता. त्याने के एल राहुलच्या मदतीने दुसऱ्या विकेटसाठी 60 धावांची भागीदारी करून भारतीय डावाला आकार दिला. विराटने या विश्वचषकातील 5 सामन्यांत केवळ दोनदा बाद झाला आहे. यापूर्वी तो दक्षिण आफ्रिकेविरोधात बाद झाला होता. पाकिस्तान, नेदरलँड व बांगलादेशाविरोधात विराट नाबाद राहिला.

विराट कोहली व के एल राहुलने दुसऱ्या विकेटसाठी 60 धावांची भागीदारी केली.
विराट कोहली व के एल राहुलने दुसऱ्या विकेटसाठी 60 धावांची भागीदारी केली.

3. सूर्याची 360 डिग्री फलंदाजी

13.3 षटकांपर्यंत भारताचा स्कोअर 101/4 होता. या ठिकाणी भारताचा आणखी एखादा गडी बाद झाला असता तर टीम इंडियाला 150 धावा करणेही अवघड झाले असते. पण या विश्वचषकात सर्वात धडाकेबाज फलंदाजी करणाऱ्या सूर्य कुमार यादवच्या मनात वेगळेच काहीतरी शिजत होते. त्याने मैदानात चौफेर फटकेबाजी करत झिम्बाब्वेच्या माऱ्याच्या चिंधड्या उडवल्या. त्याच्या फलंदाजीच्या बळावर भारताने अखेरच्या 39 चेंडूंत तब्बल 85 धावा कुटल्या. सूर्याने 244 च्या स्ट्राइक रेटने फलंदाजी करत अघ्या 25 चेंडूंत 61 धावा केल्या. त्यात 6 चौकार व 4 उत्तुंग षटकारांचा समावेश आहे.

4. भुवी-अर्शदीपचा शानदार ओपनिंग स्पेल

186 धावांचा पाठलाग करताना झिम्बाब्वेकडून फाइट बॅकची अपक्षा फार कमी होती. त्यानंतर भुवनेश्वर व अर्शदीप सिंगने उत्कृष्ट ओपनिंग स्पेल टाकून झिम्बाब्वेच्या डावाला खिंडार पाडले. भुवने पहिले षटक मेडन टाकले. या विश्वचषकातील त्याचे हे दुसरे मेडन षटक होते. त्यात त्याने एक विकेटही घेतला. अर्शदिपने आपल्या पहिल्याच षटकात 1 गडी बाद केला. आपल्या या ओपनिंग बॉलर प्लेअरने पहिल्या 5 षटकांत केवळ 21 धावा मोजून 2 बळी मिळवले.

5. शमीचा फायर पॉवर, अश्विनची फिरकी व पंड्याची कमाल

भुवी व अर्शदीपच्या शानदार सुरुवातीनंतर मोहम्मद शमीने सूत्रे सांभाळली. त्याने झिम्बाब्वेच्या डावाचा तिसरा व चौथा विकेट काढला. पाचवा बळी हार्दिक पंड्याने घेतला. त्यामुळे अवघ्या 36 धावांवर झिम्बाब्वेचा अर्धा संघ तंबूत परतला होता. त्यानंतर रवीचंद्रन अश्विनने 3 बळी घेऊन झिम्बाब्वेची शेपटी गुंडाळली. अशा प्रकारे भारताने एक सहज विजय मिळवला.

बातम्या आणखी आहेत...