आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्रीन हायड्रोजन पॉलिसीची घोषणा:भविष्याच्या प्रमुख ईंधनात आत्मनिर्भर बनेल भारत, जाणून घ्या काय असते ग्रीन हायड्रोजन?

नवी दिल्ली6 महिन्यांपूर्वी
 • कॉपी लिंक

सरकारने ग्रीन हायड्रोजन आणि ग्रीन अमोनिया बनवण्याचे धोरण जाहीर केले आहे. राष्ट्रीय हायड्रोजन मिशन अंतर्गत हे पहिले पाऊल आहे. या अभियानांतर्गत सरकारला भारतासाठी ग्रीन हायड्रोजन हब बनवायचे आहे. सरकारने 2030 पर्यंत 5 दशलक्ष टन ग्रीन हायड्रोजन तयार करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. राष्ट्रीय हायड्रोजन मिशनची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या वर्षी 15 ऑगस्ट रोजी केली होती.

सरकार हायड्रोजन आणि अमोनियाला भविष्यातील प्रमुख इंधन मानत आहे. ते भविष्यात जीवाश्म इंधन (पेट्रोल, डिझेल, कोळसा) रिप्लेस करेल. ग्रीन हायड्रोजनचे उत्पादन करणारे उत्पादक पॉवर एक्सचेंजमधून अक्षय ऊर्जा खरेदी करू शकतात, असे नवीन धोरणात नमूद करण्यात आले आहे. उत्पादक त्यांचे स्वतःचे नूतनीकरणक्षम ऊर्जा संयंत्र देखील स्थापित करू शकतात.

हायड्रोजन पॉलिसीमध्ये काय आहे खास

 • हायड्रोजन उत्पादन अर्ज सादर केल्यापासून 15 दिवसांच्या आत परवानगी दिली जाईल.
 • 30 जून 2025 पूर्वी सुरू केल्यास 25 वर्षांसाठी आंतर-राज्य पारेषण शुल्कात सूट मिळेल.
 • हायड्रोजन मिशन असलेली कंपनी 30 दिवसांपर्यंत अक्षय ऊर्जा ठेवू शकते.
 • हायड्रोजन मोहिमेसाठी एक वेबसाइट तयार केली जाईल, ज्यामध्ये याच्याशी संबंधित सर्व काम एकाच ठिकाणी केले जाईल.
 • ग्रीन हायड्रोजन आणि ग्रीन अमोनिया बनवणाऱ्या कंपनीला निर्यात आणि शिपिंगसाठी बंदराजवळ स्टोरेजसाठी जागा दिली जाईल.

भारताला भविष्यातील इंधनात आत्मनिर्भर व्हायचे आहे
ग्रीन हायड्रोजन आणि ग्रीन अमोनिया बनवण्याची चर्चा आहे कारण ते भविष्यातील प्रमुख इंधन असल्याचे मानले जाते. या अंतर्गत भारताला ग्रीन हायड्रोजन आणि ग्रीन अमोनिया यांसारख्या इंधनात स्वयंपूर्ण व्हायचे आहे. पेट्रोलियमप्रमाणेच भारताला या इंधनांसाठी इतर देशांवर अवलंबून राहायचे नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्ट 2021 रोजी राष्ट्रीय हायड्रोजन मिशनची घोषणा केली, जी पहिली पायरी आहे. हायड्रोजन मिशनच्या घोषणेनंतर रिलायन्स, टाटा आणि अदानी सारख्या अनेक कंपन्यांनी ते बनवण्याची तयारी सुरू केली आहे.

ग्रीन हायड्रोजन म्हणजे काय?
ग्रीन हायड्रोजन हा ऊर्जेचा सर्वात स्वच्छ स्त्रोत आहे. त्यामुळे प्रदूषण होत नाही. ग्रीन हायड्रोजन ऊर्जा बनवण्यासाठी हायड्रोजन आणि ऑक्सिजन पाण्यापासून वेगळे केले जातात. या प्रक्रियेत इलेक्ट्रोलायझरचा वापर केला जातो. इलेक्ट्रोलायझर अक्षय ऊर्जा (सौर, वारा) वापरतो. ग्रीन हायड्रोजनचा वापर ट्रान्सपोर्ट, रसायन, लोह यासह अनेक ठिकाणी करता येतो.

ग्रीन हायड्रोजन आणि ग्रीन अमोनियाचे फायदे

 • फॉसिल फ्यूल (पेट्रोल, डीझेल, कोळसा) पेक्षा कमीत कमी तीन पट चांगला आहे.
 • हायड्रोजनपासून कार्बन मिळत नाही.
 • हे पेट्रोल आणि डीझेलच्या तुलनेत अधिक एनर्जी एफिशिएंट आहे.
 • याचा उपयोग गाड्यांना आणि रॉकेट इंधनात केला जातो.

ग्रीन हायड्रोजन आणि ग्रीन अमोनियाचे दुष्परिणाम

 • हे एक महाग इंधन आहे ज्याची किंमत सध्या 350 ते 450 किलो आहे.
 • इतर इंधनांच्या तुलनेत वाहतूक आणि देखभालीसाठी त्याचा खर्च अधिक आहे.

ग्रीन हाइड्रोजन आणि ग्रीन अमोनिया प्रोजेक्टशी संबंधीत कंपन्या

 • रिलायंस इंडस्ट्रीज (Reliance Industries)- ग्रीन हाइड्रोजन बनवेल यासोबतच ग्रीन हाइड्रोजन बनवण्यासाठी इलेक्ट्रोलाइजर देखील बनवेल.
 • गेल इंडिया लिमिटेड (GAIL)- नॅचरल गॅसमध्ये हाइड्रोजन मिसळत आहेत। यासोबतच हे देशातील सर्वात मोठे हाइड्रोजन प्लांट लावण्याविषयी प्लान करत आहे.
 • एनटीपीसी लिमिटेड (NTPC Limited)- विंध्याचलमध्ये याने पायलट प्रोजेक्टची सुरुवात केली आहे. याचे प्रति यूनिट उत्पादन किंमत USD 2.8-3/kg आहे.
 • आयओसी (Indian Oil Corporation)- मथुरा रिफाइनरीमध्ये ग्रीन हाइड्रोजन बनवत आहे.
 • एलएंडटी (Larsen & Toubro)- हजीरा कॉम्प्लेक्समध्ये याचे प्लांट आहेत. तर इलेक्ट्रोलाइजर देखील बनवण्याची योजना आहे.
बातम्या आणखी आहेत...