आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • India Will No Longer Supply AstraZeneca Covshield Vaccine To Other Countries, Focus On Domestic Vaccination

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोना:भारत आता ॲस्ट्राझेनेकाची कोविशील्ड व्हॅक्सिन इतर देशांना देणार नाही, देशांतर्गत लसीकरणावर फोकस करणार

नवी दिल्ली24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतामध्ये कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत आणि यामध्येच एक मोठी बातमी समोर येत आहे. केंद्र सरकार आता ॲस्ट्राझेनेकाची लस इतर देशांना देणार नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, देशांतर्गत लसीकरणावर फोकस करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. देशात ॲस्ट्राझेनेका-ऑक्सफर्डच्या कोरोना व्हॅक्सिनची निर्मिती सीरम इंस्टीट्यूट ऑफ इंडिया (SII) कोविशील्ड नावाने करत आहे.

सरकारने नुकतेच कोविशील्डच्या दोन डोसमधील अंतर वाढवले आहे
केंद्र सरकारने दोन दिवसांपूर्वीच कोविशील्ड व्हॅक्सिन संदर्भात नवीन गाइडलाइन जारी केली आहे. त्यानुसार ‘कोविशील्ड’ लसीच्या दोन डोसमधील कालावधी वाढवण्यात आला आहे. आता कोविशील्डचा पहिला डोस घेतल्यानंतर दुसरा डोस ६ ते ८ आठवड्यांनी दिला जाईल. सध्या हा कालावधी ४ ते ६ आठवडे इतका आहे. कालावधी वाढवण्याचा निर्णय फक्त कोविशील्ड लसीवर लागू होईल, कोव्हॅक्सिनवर नाही.

बातम्या आणखी आहेत...