आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराफ्रान्समधून राफेल विमानांची आखरी तुकडी 15 डिसेंबरपर्यंत मिळेल, असे वरिष्ठ संरक्षण अधिकाऱ्यांनी सांगितले. फ्रान्ससोबत भारताने करार करून ३६ राफेल लढाऊ विमानं खरेदीचा सौदा केला होता. त्यापैकी 35 आधीच आली आहेत आणि पश्चिम बंगालमधील अंबाला, हरियाणा आणि हाशिमारा येथे तैनात आहेत. हा करार 2016मध्ये झाला पण या कराराची प्रक्रिया खूप आधी म्हणजे डॉ. मनमोहन सिंग सरकारच्या काळात सुरू झाली.
का आवश्यक राफेल?
दरम्यान, एअरफोर्सकडे सध्या 44 लढाऊ विमाने आहेत. त्यापैकी 34 विमाने कार्यरत आहेत.- त्यामुळेे लढाऊ विमाने भारताला आवश्यक होते.- 1996 मध्ये भारताला रशियाकडून सुखोई 30 एमकेआय मिळाले होते. जुने झालेले मिग-21 आणि मिग-27 विमाने ताफ्यातूून हटवण्यात आले आहेत.
शीतयुद्धानंतरच्या काळात भारताच्या राष्ट्रहिताच्या विस्ताराबरोबरच भारतीय हवाई दलाचे कार्यक्षेत्रही विस्तारले आहे. आज उपलब्ध साधनसामग्री, कुशल मनुष्यबळ आणि व्यावसायिक दृष्टिकोनाच्या जोरावर भारतीय हवाई दलाने आपली सामरिक पोच सिद्ध केलेली आहे. भारताच्या हितसंबंधांच्या संरक्षणासाठी जगाच्या कोणत्याही भागात कमीत कमी वेळेत पोहोचण्याची क्षमता हवाई दलाने प्राप्त केलेली आहे
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.