आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • India,CenterAmid Spike,one, ,"India Definitely Not In Community Transmission": Centre Amid Spike In Virus Cases

28 हजार कुटुंबाचा सर्व्हे:ICMR चा दावा- देशात सध्या कम्युनिटी ट्रांसमिशन नाही, प्रभावित जिल्ह्यात 0.73% लोकांनाच कोरोनाची लागण

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • लॉकडाउनमुळे कोरोना पसरण्यासा वेग कमी झाला
Advertisement
Advertisement

देशात अद्याप कोरोनाचा कम्युनिटी ट्रांसमिशन सुरू झाले नाही. इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर)ने हा दावा केला आहे. यासोबतच आयसीएमआरने एक सर्व्हेदेखील जारी केला.

हा सर्व्हे एप्रिल-मे मध्ये देशातील 83 जिल्ह्यातील 28 हजार कुटुंबावर करण्यात आला. आयसीएमआरनुसार, कोरोना प्रभावित जिल्ह्यात 0.73% लोक कोरोनाच्या विळख्यात आहेत. म्हणजेच, लॉकडाउनमुळे कोरोनचा प्रादुर्भाव जास्त पसरला नाही.

आयसीएमआरचे डायरेक्टर जनरल डॉ. बलराम भार्गव यांनी गुरुवारी सरकारच्या प्रेस कॉन्फ्रेंसमध्ये सांगितले, ‘‘हा शब्द (कम्युनिटी ट्रांसमिशन) वर वाद सुरू आहे. डब्ल्यूएचओने याचा अर्थ सांगितला नाही. आपल्या देशात कोरोनाचा परिणाम सध्या फार कमी आहे. हा 1% पेक्षाही कमी आहे. शहरी भागात जास्त परिणाम आहे. कंटेनमेंट झोनमध्ये त्यापेक्षाही जास्त परिणा जाणवत आहे. परंतू, हेदेखील सत्य आहे की, आपल्या देशात कम्युनिटी ट्रांसमिशन सुरू झाले नाही.’’

देशाचा रिकव्हरी रेट वाढला-आरोग्य मंत्रालय

आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी सांगितले की, आता देशात संक्रमितांपेक्षा ठीक होणाऱ्यांची संख्या आहे. मागच्या एका महिन्यात रिकव्हरी रेट 11% वाढून 49.21% झाला आहे.

Advertisement
0