आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआज सकाळी आठ वाजता श्रीनगर येथील दल लेकपासून फ्लाय पास्टची सुरुवात झाली. वायुसेनेच्या विमानांनी दल लेकवर फॉर्मेशनमध्ये फ्लाय केले. खराब हवामान असूनही विमानांनी उंच भरारी घेतली. काश्मीरमध्ये रात्रीपासून पाऊस पडत आहे. हा फ्लाय पास्ट श्रीनगरनंतर चंदीगडमध्ये दिसेल.
नऊ फायटर प्लेन आणि तीन ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट इंडियन एअरफोर्सच्या आतापर्यंत सर्वात लांब फ्लाय पास्टचा हिस्सा असतील. हा फ्लाय पास्ट उत्तरेकडे श्रीनगरमधून दक्षिणेकडे कोईम्बतूरपर्यंत 2570 किमी आणि पूर्वेकडे गुवाहाटीपासून पश्चिमेकडे अहमदाबादपर्यंत 1966 किमीचे हवाई अंतर पार करतील. करोना व्हायरसविरोधात डॉक्टर, नर्सेस, पोलीस, स्वच्छता कर्मचारी लढाई लढत आहेत. त्यांना मानवंदना देण्यासाठी हा फ्लाय पास्ट आहे. व्हायरसचा सामना करणाऱ्या वॉरियर्सचा सन्मान करण्यासाठी तीन सैन्य प्रथमच पुढे आले आहे. देशाचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपिन रावत यांनी शुक्रवारी याची घोषणा केली होती.
हरियाणा: सैन्य दलाने सरकारी रुग्णालयात फुलांचा वर्षाव केला
भारतीने सेनेने हरियातील पंचकुला येथील सरकारी रुग्णालयासमोर मेडिकल स्टाफ आणि डॉक्टरांच्या सन्मनार्थ बँड वाजवला. भारतीय वायुसेनेच्या हेलिकॉप्टरने देखील रुग्णालयावर फुलांचा वर्षाव केला.
दिल्ली : पावसामुळे फ्लाय पास्ट एक तासासाठी पुढे ढकलण्यात आला
कर्नाटक : विधानसभेसमोर सैन्याने बॅन्ड वाजविला
सैन्याने रविवारी सकाळी बंगळुरू विधानसभा, नॅशनल वॉर मेमोरियल आणि एमजी मेट्रो रेल्वे स्टेशनवर कोरोनाविरोधात एकता दर्शवली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.