आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Indian Air Force (IAF) Sends Proposal To Buy 33 Russian Fighter Jets Amid Tensions Between India And China

भारत-चीन वादाचा परिणाम:भारतीय एअरफोर्सने पाठवला 33 नवीन फायटर जेट खरेदीचा प्रस्ताव, यात 21 मिग आणि 12 सुखोई सामील

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 10 ते 15 वर्षात वायुसेनेने 272 सुखोई-30 फायटर जेटची ऑर्डर दिली
Advertisement
Advertisement

गलवान घाटीत भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये झालेल्या हिंसक मारामारीचा परिणाम आता संरक्षण रणनितींवर पडल्याचे दिसत आहे. भारतीय वायुसेनेने केंद्र सरकारसा रशियाकडून 33 नलीन फायटर जेट खरेदी करण्याचा प्रस्ताव पाठवला आहे. यात 21 मिग-29 आणि 12 सुखोई- 30 एमकेआय सामील आहेत.

न्यूज एजेंसी एएनआयने सरकारी सूत्रांच्या हवाल्याने सांगितले की, एअरफोर्स मागील काही दिवसांपासून यावर काम करत आहे. हे एअरक्राफ्ट खरेदी करण्यासाठी 6 हजार कोटी रुपये लागणार आहेत. पुढच्या महिन्यात संरक्षण मंत्रालयाची एक उच्च पदस्थ बैठक होणार आहे. यादरम्यान मंत्रालयाच्या मंजुरीसाठी प्रस्ताव ठेवला जाऊ शकतो.

वायुसेनेने अपघातात गमावले फायटर एअरक्राफ्ट

सूत्रांनी सांगितले की, वायुसेनेने आतापर्यंतर अनेक अपघातात आपले एअरक्राफ्ट गमावले आहेत, त्यामुळे आता नवीन एअरक्राफ्टची गरज आहे. मागील 10-15 वर्षात भारतीय वायुसेनेने 272 सुखोई-30 फायटर जेटची ऑर्डर दिली आहे. 

एअरक्राफ्ट मिगवर अभ्यास करेल एअरफोर्स रशियाकडून जे मिग 29 मिळणार आहेत, ते अनेक वर्षापर्यंत वायुसेनेत सेवा देऊ शकतात का नाही, याबाबत एअरफोर्सला अभ्यास करायचा आहे. मिग-29 ला उडवणारे पायलट त्याची बनावट आणि मशीनरीचे जानकार असतात, पण रशियाकडे जे मिग देण्याचा प्रस्ताव दिला आहे, ते थोडे वेगळे आहेत.

Advertisement
0