आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Indian Army Deployed Assam Riflewomen In Kashmir To Assist Men Soldiers; News And Live Updates

काश्मीरमध्ये महिला सैनिक तैनात:दहशतवाद संपवण्यासाठी घाटीत पोहोचल्या आसाम रायफल्सच्या महिला सैनिक; काश्मिरी मुली पोलिसांत रुजू होण्यासाठी उत्साही

श्रीनगरएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • मादक पदार्थांची तस्करी थांबवण्यासाठी मदत

भारतीय लष्कराने आसाम रायफल्सच्या महिला सैनिकांवर मोठी जबाबदारी सोपवली आहे. या महिला सैनिकांना काश्मीरमधील गांदरबल जिल्ह्यात तैनात करण्यात आले आहे. ज्यामध्ये या महिला सैनिक पुरुष सैनिकांना या खोऱ्यातील दहशतवादी कारवाई रोखण्यासाठी मदत करणार आहे.

महिला व मुलांची तपासणी करण्यासाठी या महिला सैनिकांना मोटार वाहन चौक्यांवर तैनात करण्यात आले आहे. त्यासोबतच कॉर्डन अँड सर्च ऑपरेशन (CASO) दरम्यान, घरांची तपासणी करण्यासाठी या महिला सैनिकांची मदत घेतली जाणार आहे.

मादक पदार्थांची तस्करी थांबवण्यासाठी मदत
या महिला सैनिकांना काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यात तैनात करण्यात आले असून यांना या भागातील मादक पदार्थांची तस्करी थांबवण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. कारण यापूर्वी पुरुष सैनिकांना संशयित महिलांची तपासणी करण्यास अडचण येत होती. त्यामुळे भागातील तस्करी मोठ्या प्रमाणात कमी होतील असे एका वरीष्ठ अधिकाऱ्याने सांगितले आहे.

2 हजार मुलींनी पोलिस भरतीत भाग घेतला
काश्मीरमधील मुलींमध्ये पोलिसांत रुजू होण्याबाबत प्रचंड उत्सुकता आहे. कारण नुकतेच झालेल्या पोलिस भरतीत काश्मीरमधील 2 हजार मुलींनी सहभाग घेतला होता. ही भरती 650 पदासाठी करण्यात आली होती. येथे दोन महिला बटालियन तयार करण्यात येणार असून यासाठी 650-650 महिलांची भरती घेण्यात येत आहे.

पोलिसात रुजू होण्याची माझी आवड
भरतीमध्ये मोठ्या प्रमाणात मुलींनी सहभाग घेतला असून देशसेवेसाठी अनेक मुली उत्साही होत्या. 26 वर्षीय सना जान ही उत्तर काश्मीरची रहिवासी आहे. ती म्हणते की, पोलिसांत रुजू होणे माझी आवड आहे. यामुळे मला देशासेवा करायची असून माझ्या समाजावरील गुन्हेगारीचे डाग मिटवायचे असल्याचे सना यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...