आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Indian Army Helicopter Accident Update; IAF Chopper Crashes In Pathankot Ranjit Sagar Dam

हेलिकॉप्टर दुर्घटना:पठाणकोटजवळ रणजीत सागर तलावात लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळले, पायलट आणि सह-पायलट सुरक्षित

पठाणकोट2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पठाणकोटजवळील रणजीत सागर तलावात मंगळवारी लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळले. या अपघातात वैमानिक आणि सह-वैमानिक सुरक्षित आहेत. एनडीआरएफ आणि पोलिसांचे बचावकार्य सुरू आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 254 आर्मीच्या एव्हिएशन स्क्वाड्रनच्या हेलिकॉप्टरने सकाळी 10:20 वाजता ममून कॅंटमधून उड्डाण केले होते. रणजीत सागर तलावावरून हेलिकॉप्टर खूप कमी उंचीवर उडत होते आणि ते कोसळले.

गोताखोरांच्या मदतीने शोध सुरू आहे
लष्कराच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पठाणकोटला लागून असलेल्या जम्मू -काश्मीर भागातील रणजीत सागर धरणाजवळ सैनिक हेलिकॉप्टरने गस्त घालत होते. धरणातील बोटी आणि गोताखोरांच्या मदतीने हेलिकॉप्टरचा शोध घेतला जात आहे. जास्त खोलीमुळे हेलिकॉप्टरचे लोकेशन शोधण्यात अडचण येत आहे.

6 महिन्यांपूर्वी पठाणकोटहून जाणारे ऍडव्हान्स हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झाले होते
या वर्षी जानेवारीमध्ये भारतीय लष्कराचे ऍडव्हान्स लाइट हेलिकॉप्टर (ALH) ध्रुव जम्मू आणि काश्मीरच्या कठुआ येथे कोसळले होते. हेलिकॉप्टरचे दोन्ही पायलट गंभीर जखमी झाले होते. त्यांना जवळच्या मिलिटरी बेस हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, जिथे एका वैमानिकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

बातम्या आणखी आहेत...