आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करालडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (LAC) तैनात भारतीय लष्कराने आपल्या हालचालींत वाढ केली आहे. त्यातच भारतीय सैन्याचे काही जवान गलवान खोऱ्यालगत क्रिकेट खेळताना दिसून येत आहेत. यासंबंधीच्या वृत्तानुसार, क्रिकेटचा हा डाव नेमका कुठे रंगला हे अद्याप स्पष्ट झाले नाही. पण याच ठिकाणी जून 2020 मध्ये भारत-चीनमध्ये हिंसक चकमक झाल्याचा दावा केला जात आहे.
दुसरीकडे, जवानांनी गत काही महिन्यांत LAC लगतच्या भागातील घोडे व खेचरांचा सर्व्हे केला आहे. पेंगोग सरोवर परिसरातही हाफ मॅरेथॉन सारख्या गतिविधी झाल्या आहेत.
गलवान खोऱ्यातील चीनसोबतच्या हिंसक संघर्षानंतर दोन्ही देशांचे लष्कर अलर्ट मोडवर आहे. अरुणाचल प्रदेशातील तवांगमध्येही काही महिन्यांपूर्वी भारत-चीनच्या सैन्यांत हिंसक झडप झाली होती.
भारतीय लष्कर म्हणाले - आमच्यासाठी अशक्य काहीच नाही
यासंबंधीच्या वृत्तानुसार, अत्यंत उंचीवर असणाऱ्या या भागात तैनात लष्कराच्या तुकड्या हिवाळ्याच्या दिवसांत विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करतात. हे छायाचित्र भारतीय लष्कराच्या लेह स्थित 14 व्या कोअरनेही ट्विट केले आहे. त्यात ते म्हणाले - पटियाला ब्रिगेड त्रिशूळ डिव्हिजनने पूर्ण उत्साह व शौर्याने शून्याखाली तापमान असणाऱ्या अत्यंत उंच प्रदेशात एका क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले. आमच्यासाठी अशक्य असे काहीच नाही.
सरावाच्या नावाने सैनिक तैनात
चीनने 2020 मध्ये पूर्व लड्डाखच्या सीमावर्ती भागात सरावाच्या नावाने सैनिक तैनात केले होते. त्यानंतर येथील अनेक ठिकाणी चिनी सैनिकांनी घुसखोरी केली. प्रत्युत्तरादाखल भारतीय लष्करानेही या भागातील आपली सैन्य उपस्थिती वाढवली होती.
यामुळे स्थिती एवढी टोकाला गेली होती की, तब्बल 4 वर्षांनंतर प्रथमच एलएसीवर गोळीबार झाला होता. दरम्यान 15 जून रोजी गलवान खोऱ्यात चिनी सैन्याशी झालेल्या हिंसक चकमकीत भारताच्या 20 जवानांना वीरमरण आले होते. या घटनेत त्याचेही अनेक जवान मारले गेल्याचा दावा केला जातो. पण चीनने त्याची अजून पुष्टी केली नाही.
चीनच्या कुरापतींशी संबंधित खालील बातमी वाचा...
अंदमान-निकोबारमध्येही दिसले होते फ्लाइंग ऑब्जेक्ट:2022 मध्ये लष्करी तळांजवळ उड्डाण, आता होणार तपास
2022 मध्ये भारतातील अंदमान-निकोबार बेटावरही एक फ्लाइंग ऑब्जेक्ट दिसले होते. हे ऑब्जेक्ट 5 फेब्रुवारी 2023 रोजी दक्षिण कॅरोलिनामध्ये अमेरिकेने पाडलेल्या चिनी बलूनसारखे दिसत होते. मात्र, अंदमान-निकोबारमध्ये दिसलेले हे ऑब्जेक्ट काय होते, हे कोणालाच माहीत नव्हते. भारत सरकारनेही याबाबत कोणतेही अधिकृत वक्तव्य दिलेले नाही. येथे वाचा संपूर्ण बातमी...
चीन Vs अमेरिका:कोणाची किती आहे लष्करी ताकद? फक्त 2 युद्धांचा अनुभव, तरीही अमेरिकेला धमकावतोय चीन!
चीन आणि अमेरिका या दोन देशांतील तणाव वाढला आहे. चीनकडून सातत्याने धमक्या येऊनही अमेरिकेच्या प्रतिनिधीगृहाच्या अध्यक्षा नॅन्सी पेलोसी यांनी तैवानचा दौरा केला. त्यावेळी प्रतिक्रिया म्हणून चीननेही तैवानलगतच्या समुद्रात सैन्य सराव सुरू केला. अमेरिकेला आपण घाबरत नाही, जशास तसे उत्तर देऊ शकतो, हे चीनने या कृतीतून दाखवून दिले आहे. यामुळे चीन-अमेरिका यांच्यात युद्धाची ठिणगी पडते की काय, अशी चर्चा सुरू झाली आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.