आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Indian Army To Short Service Commission; Common Citizens Join Force Three Year TOUR OF Duty

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

युवकांसाठी संधी:तीन वर्षे सैन्यात सामिल होऊन देशसेवा करू शकतील सामान्य नागरिक; टूर ऑफ ड्यूटीच्या प्रस्तावावर विचार करत आहे सरकार

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • युवकांना आकर्षित करण्याची योजना भारतीय लष्कराचा नवीन प्रस्ताव

लष्करात सामिल होऊन देशसेवा करू इच्छित असाल तर सामान्य नागरिकांसाठी सुवर्ण संधी आहे. केंद्र सरकार सामान्य नागरिकांना तीन वर्षांसाठी लष्करात सामिल करून घेण्याच्या प्रस्तावावर सध्या विचार करत आहे. वृत्तसंस्था एएनआयच्या वृत्तानुसार, सूत्रांकडून ही गोष्ट समोर आली आहे. यासाठी लष्कर ‘टूर ऑफ ड्यूटी’ वर विचार करत आहे. हा प्रस्ताव मान्य झाल्यास टूर ऑफ ड्यूटी अंतर्गत निवडलेल्यांना तीन वर्षांसाठी लष्करात सेवा देता येणार आहे. या प्रस्तावातील सविस्तर माहिती अद्याप समोर आलेली नाही.

युवकांना आकर्षित करण्याची योजना

एएनआयच्या वृत्तानुसार, लष्कराच्या प्रवक्त्यांनी या प्रस्तावाबद्दल अधिकृत दुजोरा दिला. यामध्ये लष्कर देशातील प्रतिभावान युवकांना आकर्षित करू इच्छित आहे. या योजनेच्या माध्यमातून युवक लष्करात सामिल होऊ शकतील. काही कारणास्तव निवड न झालेले उमेदवार सुद्धा यामध्ये अप्लाय करून तीन वर्षांसाठी पात्र ठरू शकतील. भारतीय लष्करात चांगल्या अधिकाऱ्यांची कमतरता आहे. लष्कर हीच कमतरता नवीन योजनेतून भरून काढण्याचा विचार करत आहे. सद्यस्थितीला शॉर्ट सर्विस कमिशन (एसएससी) च्या माध्यमातून 10 वर्षांसाठी युवकांना लष्करात सामिल होण्याची संधी दिली जाते. आधी या माध्यमातून भरती होणाऱ्या युवकांचा कार्यकाळ 5 वर्षांचा होता. त्यामध्ये बदल करून तो 10 वर्षांपर्यंत वाढवण्यात आला होता.

बातम्या आणखी आहेत...