आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Indian Athletes Felicitation Ceremony In Delhi Neeraj Chopra Gold Medalist Wrestler Ravi Dahiya Hockey Team | Tokyo Olympics

ऑलिम्पिकच्या रत्नांचा सन्मान:सुवर्ण पदक दाखवत नीरज चोप्रा म्हणाला- त्या दिवसापासून मी हे खिशात घेऊन फिरतोय, हे माझे नाही, संपूर्ण देशाचे आहे

नवी दिल्ली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • क्रीडा मंत्र्यांनी नवीन हिरोंचे आभार मानले

टोकियो ऑलिम्पिक पदक विजेते सर्व खेळाडू देशात परतले आहेत. नीरज चोप्रा, रवी दहिया, बजरंग पुनिया, लवलिना बोरगोहेन आणि पुरुष हॉकी संघाचे विमानतळावर जोरदार स्वागत करण्यात आले. यानंतर अशोका हॉटेलमध्ये या सर्व खेळाडूंचा सन्मान करण्यात आला.

अॅथलेटिक्समध्ये सुवर्णपदक पटकावणाऱ्या नीरज चोप्रा याने स्टेजवर येऊन आपले पदक प्रथम दाखवले. तो म्हणालो - हे माझे नाही तर संपूर्ण देशाचे पदक आहे. पदक मिळाले त्या दिवसापासून मला ना जेवण करता आले ना झोप आली. त्या दिवसापासून मी माझ्या खिशात पदक घेऊन फिरत आहे. समर्थनासाठी सर्वांचे खूप आभार. सुवर्णपदक जिंकणे हा माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा क्षण आहे.

थ्रो आणि केंसाविषयीही बोलला नीरज चोप्रा
थ्रोविषयी नीरज म्हणाला- थ्रोपूी, मी माझ्या मनात विचार केला होता की मला माझे 100% द्यायचे आहे आणि कोणालाही घाबरायचे नाहीये. पहिल्या थ्रोनंतरच मला वाटले की हा माझा वैयक्तिक सर्वोत्तम थ्रो आहे. केसांच्या प्रश्नावर नीरज म्हणाला की वयाच्या 10 व्या वर्षापासून मोठे केस ठेवत आहे, पण 2-3 स्पर्धांमध्ये त्याचा त्रास होऊ लागला. यानंतर केस छोटे केले.

कुस्तीत सिल्वर मेडल जिंकणाऱ्या रवी दहियाला सन्मानित करताना क्रीडा मंत्री
कुस्तीत सिल्वर मेडल जिंकणाऱ्या रवी दहियाला सन्मानित करताना क्रीडा मंत्री
रेसलिंगमध्ये ब्रॉन्ज मेडल जिंकणाऱ्या बजरंग पूनियालाही सन्मानित करण्यात आले
रेसलिंगमध्ये ब्रॉन्ज मेडल जिंकणाऱ्या बजरंग पूनियालाही सन्मानित करण्यात आले
टोकियो ऑलिम्पिकमध्ये पुरुष हॉकीमध्ये भारताला कांस्य पदक मिळाले. यासाठी पुरुष हॉकी टीमचे कर्णधार मनप्रीत सिंह आणि संपूर्ण संघाला क्रीडा मंत्र्यांनी सन्मानित केले.
टोकियो ऑलिम्पिकमध्ये पुरुष हॉकीमध्ये भारताला कांस्य पदक मिळाले. यासाठी पुरुष हॉकी टीमचे कर्णधार मनप्रीत सिंह आणि संपूर्ण संघाला क्रीडा मंत्र्यांनी सन्मानित केले.
बॉक्सिंगमध्ये कांस्यपदक मिळवणाऱ्या लवलिना बोरगोहेनला केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी सन्मानित केले.
बॉक्सिंगमध्ये कांस्यपदक मिळवणाऱ्या लवलिना बोरगोहेनला केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी सन्मानित केले.

क्रीडा मंत्र्यांनी नवीन हिरोंचे आभार मानले
क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले- आजची संध्याकाळ ऑलिम्पिकमध्ये भारताचे नाव उंचावणाऱ्या खेळाडूंची संध्याकाळ आहे. 135 कोटी जनतेच्या वतीने मी सर्व पदक विजेत्यांचे अभिनंदन करतो. नीरज चोप्रा, तुम्ही केवळ पदकच नव्हे तर हृदयही जिंकले आहे. तुम्ही सर्व खेळाडू नवीन भारताचे नवीन नायक आहात. आमचे खेळाडू पुढील ऑलिम्पिकमध्ये चांगली कामगिरी करतील. आम्ही तुमच्यासाठी कोणतीही कसर सोडणार नाही. सर्वकाही आपल्याला चांगल्याप्रकारे उपलब्ध करुन देऊ.

किरण रिजिजू यांनीही मानले आभार
ऑलिम्पिक ही जगातील सर्वात मोठी क्रीडा स्पर्धा आहे. हा आमच्यासाठी अभिमानाचा क्षण आहे. कोट्यावधी भारतीयांच्या वतीने मी तुमच्या सर्व खेळाडूंचे अभिनंदन करतो.

बातम्या आणखी आहेत...