आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Indian Citizens Are The Most Optimistic In The World, With 57 Per Cent Believing That The Country's Economy Will Recover In 2 3 Months

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आशेचे आकडे:जगात भारतीय नागरिक सर्वाधिक आशावादी, 2-3 महिन्यांत देशाची अर्थव्यवस्था सुरळीत होण्याचा 57 टक्क्यांना विश्वास

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • चार मोठ्या संस्थांचे सर्व्हे सांगताहेत की अर्थव्यवस्थेबाबत जगात भारतीय सर्वाधिक पॉझिटिव्ह

जगात सर्वाधिक आशावादी भारतीय आहेत. येथे ग्राहक उत्पन्न व बचतीत घट झाल्यानंतरही आर्थिक सुधारणांबाबत आशावादी आहेत. मॅकेंझी अँड कंपनीने १ ते ४ मे दरम्यान केलेल्या सर्वेक्षणात ५७ टक्के लोकांनी अर्थव्यवस्था पुन्हा २-३ महिन्यांपूर्वी होती तशी होईल, असा विश्वास व्यक्त केला. असेच इप्सॉसच्या सर्व्हेक्षणात ६३% भारतीयांना लवकरच अर्थव्यवस्था सुरळीत होण्याची आशा आहे. म्हणजे ५ पैकी ३ भारतीय भविष्याबाबत आशावादी आहेत.

मॅकेंझीचा अहवाल : ९३% मानतात एका वर्षात जीवन पूर्वीसारखे होईल

दैनंदिन आयुष्याविषयी आम्हीही जास्त आशावादी आहोत. मॅकेंझीच्या या सर्वेक्षणात केवळ ७ टक्के लोकांनी जनजीवन सुरळीत होण्यासाठी एक वर्ष लागेल असे सांगितले. उर्वरित ९३ % लोकांनुसार, एक वर्षाच्या आत जीवनमान पूर्वीसारखे होईल. ८% लोकांना वाटते, एक महिन्यात पूर्ववत होईल, तर महामारी ऑगस्ट किंवा ऑक्टोबरपर्यंत राहू शकते, असे ३२ % लोकांचे मत होते.

वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम : भारतीय जास्त खर्च करण्याच्या तयारीत

वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमनुसार, भारतात लोक खर्च वाढवण्याची तयारी करत आहेत. याच प्रकारचा ट्रेंड चीन, इंडोनेशिया व नायजेरियामध्ये बघायला मिळाला. तर अमेरिका, रशिया, जर्मनीसारख्या अनेक देशांमध्ये लोक खर्च कमी करण्याचे नियोजन करत आहेत. कॅपजेमिनी रिसर्च इन्स्टिट्युटच्या सर्वेक्षणानुसार, ५७ % भारतीय यावर्षी कार घेण्याच्या विचारात असल्याचे सांगितले.

डेटा फर्म युगोव्हचा अहवाल : ४८% भारतीयांना ‌विश्वास, महामारी लवकरच संपेल

लंडन येथील ग्लोबल मार्केट रिसर्च आणि डेटा कंपनी युगोव्हच्या सर्वेक्षणात कोविड-१९ लवकरच संपेल याबाबत भारतीय नागरिक आशावादी आहेत. भारतात सुमारे ४८ % लोक म्हणाले, जुलैच्या शेवटी महामारी संपेल. तर बाकी ४०% लोकांना महामारी लवकर संपण्याची आशा आहे. या संकटात काही न काही चांगलेही घडल्याचे बहुतांश जणांचे म्हणणे आहे.

बातम्या आणखी आहेत...