आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुजरातमधील पाकिस्तानच्या नागरिकांना मिळणार भारताचे नागरिकत्व:निवडणुकीच्या तोंडावर मोदी सरकारची तयारी

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

गुजराती विधानसभा निवडणुका आता अवघा काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. निवडणूक आयोग लवकरच गुजरात विधानसभा निवडणुकीची घोषणा करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. केंद्र सरकारने अफगाणिस्तान, बांगलादेश आणि पाकिस्तानमधून आलेल्या आणि गुजरातमध्ये स्थायिक झालेल्या नागरिकांना भारतीय नागरिकत्व देण्याची तयारी सुरू केली आहे.

गुजरात मधील दोन जिल्ह्यात स्थायिक झालेले हिंदू, शिख, बौद्ध, पारसी आणि इसाई यांना नागरिकत्व कायदा 1955 अंतर्गत भारतीय नागरिकत्व देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नागरिकत्व सुधारणा कायदा 2019 अर्थात CAA ऐवजी 1955 कायद्याअंतर्गत नागरिकत्व देण्याची तयारी केंद्र सरकारने केली आहे.

केंद्रीय गृहमंत्र्यांच्या वतीने जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार जे हिंदू, शिख, बौद्ध, पारसी आणि ईसाई नागरिक अफगाणिस्तान, बांगलादेश आणि पाकिस्तान मधून आले आहेत आणि गुजरातमधील आणंद आणि महेसाणा येथे स्थायिक झाले आहेत त्यांना हे नागरिकत्व देण्यात येणार आहे. त्यासाठी त्यांना ऑनलाईन नोंदणी करावी लागणार आहे.

ऑनलाइन अर्ज करण्याच्या सूचना
गुजरात मधील दोन जिल्ह्यात राहणाऱ्या लोकांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची सूचना देण्यात आल्या आहे. या अर्जांची पडताळणी जिल्हास्तरीय पातळीवर जिल्हाधिकारी यांच्यामार्फत करण्यात येणार आहे. त्यांची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर जिल्हाधिकारी आपला अहवाल केंद्र सरकारकडे जमा करतील. त्यानंतर कागदपत्रांची तपासणी होऊन नागरिकत्व देण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे.

बातम्या आणखी आहेत...