आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Indian Companies Are Fulfilling The Promises Of US President Biden, Jobs Have Been Given To 5 Lakh People

वाढती पत:अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन यांची आश्वासने पूर्ण करत आहेत भारतीय कंपन्या, 5 लाख लोकांना दिल्या नोकऱ्या

न्यूयॉर्क | मोहंमद अली14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिकी राष्ट्राध्यक्ष बायडेन हे आपल्या देशातील तरुणांना रोजगार देण्याची आश्वासने देत आहेत आणि ती भारतीय कंपन्या पूर्ण करत आहेत. अमेरिकेत २०० पेक्षा जास्त भारतीय कंपन्या जवळपास ३.२८ लाख कोटींच्या (४० अब्ज डॉलर) गुंतवणुकीसह ५ लाख अमेरिकनांना रोजगारही देत आहेत. अमेरिकी वाणिज्य विभागाच्या अंतर्गत अहवालानुसार, आगामी दोन वर्षात भारतीय कंपन्यांचा गुंतवणूक व रोजगार आकडा दुप्पट होण्याची शक्यता आहे.

2020 मध्ये भारतीय कंपन्यांनी 1.81 लाख कोटींच्या गुंतवणूकीसह जवळपास सव्वा लाख लोकांना नोकऱ्या दिल्या होत्या. यादरम्यान भारतीय कंपन्यांनी अमेरिकी समाजाच्या भल्यासाठी 1435 कोटी रुपये कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी सीएसआर अंतर्गत खर्च केले. विविध प्रकारच्या संशोधनासाठी 8200 कोटींचा निधीही भारतीय कंपन्यांनी जारी केला. भारतीय कंपन्यांची व्याप्तीही वाढली आहे. अमेरिकेच्या सर्व 50 राज्यांमध्ये भारतीय कंपन्या आहेत.

अमेरिकेला फायदा : कर्मचाऱ्यांमधील तांत्रिक कौशल्यात ३५% वाढ : अहवालानुसार भारतीय कंपन्यांमुळे अमेरिकी कर्मचाऱ्यांचे तांत्रिक कौशल्य ३५ टक्क्यांनी वाढले आहे. अहवालात हाही उल्लेख आहे की, भारतीय कंपन्या रोजगार देण्यासह सामुदायिक विकासातही योगदान देतात. असे म्हटले जाते की, पुढच्या वर्षीची राष्ट्राध्यक्ष निवडणूक पाहता भारतीय कंपन्यांना विशेष पॅकेज मिळण्याची शक्यता आहे.

*गुंतवणूक : हजार कोटी रुपयांत
नवी क्षेत्रेही : आयटीनंतर आता वैद्यकीय क्षेत्रातही भारतीय कंपन्यांचा दबदबा
आयटी क्षेत्रात भारतीय कंपन्यांची सर्वाधिक १.३१ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आहे. आता दुसऱ्या क्रमांकावर ४१ हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह वैद्यकीय क्षेत्र आहे. या क्षेत्रात गेल्या दोन वर्षांमध्ये ३० टक्क्यांची वृद्धी झाली आहे. आर्थिक क्षेत्रामध्ये साडेएकोणीस हजार कोटी रुपये आणि करमणूक व अभियांत्रिकी क्षेत्रामध्ये साडे १६ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक आहे.

अमेरिकेत २०० पेक्षा जास्त कंपन्या, ३.२८ लाख कोटींची विक्रमी गुंतवणूकही

टॉप 5 राज्ये​​​​​​​
राज्य नोकऱ्या गुंतवणूक*
टेक्सास 20,206 80
न्यूयॉर्क 19,162 17
न्यूजर्सी 17,713 37
वॉशिंग्टन 14,525 61
फ्लोरिडा 14,418 12

इतर राज्ये... कॅलिफोर्नियात १४,३३४, जॉर्जियात १३,९४५, आेहायोत १२,१८८, मोंटानात ९,६०३ व इलिनोइसमध्ये ८,४५४ लोकांना नोेकऱ्या दिल्या.