आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

देशात कोरोना:24 तासांत 54 हजार 45 नव्या रुग्णांची वाढ, 78,194 रुग्ण कोरोनामुक्त झाले, 710 लोकांचा मृत्यू; आतापर्यंत 71.13 लाख संक्रमित

नवी दिल्ली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
हा फोटो पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा आहे. सोमवारी त्या कोलकातात एका कार्यक्रमात गेल्या होत्या. यावेळी त्यांनी मास्क लावला होता. - Divya Marathi
हा फोटो पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा आहे. सोमवारी त्या कोलकातात एका कार्यक्रमात गेल्या होत्या. यावेळी त्यांनी मास्क लावला होता.
  • देशात आतापर्यंत 62.24 लाख रुग्ण बरे झाले, 8.37 रुग्णांवर उपचार सुरू

देशात कोरोनाबाधितांचा आकडा 71 लाख 73 हजार 345 झाला आहे. तर सोमवारी 710 लोकांचा मृत्यू झाला. दुसरीकडे उपराष्ट्रपती व्यकंय्या नायडून यांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. एम्सच्या मेडिकल टीमने त्यांच्या तपासणीनंतर याची पुष्टी केली. 29 सप्टेंबर रोजी त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. यानंतर ते क्वारंटाइन होते. आता त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे.

देशात आतापर्यंत 62.24 लाख रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर 1 लाख 9 हजार 894 रुग्णांचा मृत्यू झाला. रुग्ण बरे होण्याचा वाढल्याने अॅक्टिव्ह रुग्णही कमी होत आहेत. मागील 26 दिवसांत यापैकी 15% घसरण झाली आहे. अॅक्टीव्ह रुग्णांची संख्या 16 सप्टेंबर रोजी 10.14 लाख पार होती. ती आता 8.37 लाख पार झाली आहे. ही आकडेवारी covid19india.org नुसार आहे.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser