आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Indian Corona Vaccine Safest, Confidence Boosted, Vaccine Given In 6 States On Sunday

कोरोना लसीकरण:भारतीय लसी सर्वात सुरक्षित, विश्वास आणखी वाढला, रविवारी 6 राज्यांत दिली लस

नवी दिल्ली6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पहिल्या दिवशी सर्वाधिक लोकांना लस देणारा भारत ठरला जगातील पहिला देश

भारतात कोरोना लसीकरण मोहिमेला दोन दिवस पूर्ण झाले. रविवारी आंध्र, अरुणाचल, केरळ, कर्नाटक, मणिपूर, तामिळनाडूत एकूण १७,०७२ जणांना लस देण्यात आली. शनिवारी २,०७,२२९ जणांना लस देण्यात आली होती. २४ तास उलटल्यानंतर त्यापैकी ४४७ (०.२०%) जणांमध्येच किरकोळ साइड इफेक्ट दिसले. एक जण हृषीकेश एम्समध्ये निगराणीत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानुसार, देशात आतापर्यंत एकूण २,२४,३०१ लोकांना लस टोचण्यात आली आहे. एक दिवसात भारताने जगात सर्वाधिक लोकांना लस दिली आहे. कोविन अॅपमधील तांत्रिक समस्येमुळे महाराष्ट्रात १८ जानेवारीपर्यंत लसीकरण होणार नाही. केंद्राने राज्यांना जानेवारीत १० दिवस लसीकरण करण्यास सांगितले आहे. राज्यांनी त्या हिशेबाने दिवस निश्चित केले आहेत, त्यामुळे रविवारी अनेक राज्यांत लसीकरण झाले नाही. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी भारताची प्रशंसा करत म्हटले की, तो ‘जगाच्या फार्मसी’च्या रूपात, संपूर्ण जगात ५०% पेक्षा जास्त लसींचा पुरवठा करत आहे.

फक्त ही किरकोळ लक्षणे
- किरकोळ वेदना, चक्कर, घाम, छाती भरून येणे, लाल चट्टे, सूज, ताप. हे सामान्य आहे.
...आणि लक्षात ठेवा, पहिल्या डोसनंतर २८ दिवसांनी दुसरा डोस मिळेल. नंतर २ आठवड्यांनी अँटीबॉडी विकसित होते. मास्क घाला, फिजिकल डिस्टन्सिंग पाळा, हात धुवा. शुगर ड्रिंक्स, प्रोसेस्ड व फास्ट फूड, अल्कोहोलिक पदार्थ टाळा, त्यामुळे रोगप्रतिकारक यंत्रणा प्रभावित होते.

लस किती सुरक्षित व प्रभावी आहे, टोचण्याआधी काय करायचे, काय नाही? या प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या देशातील सर्वात प्रतिष्ठित अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेचे (एम्स) संचालक डॉ. प्रा. रणदीप गुलेरिया यांच्याकडून-
लस घेण्यासाठी नाष्टा, जेवण करूनच जा

लस टोचून घेण्यासाठी तुम्ही कोणती प्रक्रिया वापरली?
याबाबत अफवा पसरत असल्याचे बघून मी कोव्हॅक्सिनची लस घेतली. मला स्वत:लाच लस घ्यायला हवी असे मला वाटले. म्हणून मी माझ्या नावाची नोंदणी केली आणि कोविन अॅपवर पहिल्याच दिवशी माझे नाव आले. लस घेण्याच्या एक दिवस आधी मला एसएमएस आला. त्यात लस घेण्याची वेळ आणि ठिकाणाबाबत माहिती होती. मी केंद्रावर गेलो. लस टोचून मला आता ३६ तास झाले असून मी पूर्णपणे ठीक आहे. कोणताही त्रास नाही.

लस घेण्याआधी काय काळजी घेणे आवश्यक आहे?
तशी काही काळजी घ्यायची गरज नाही. हो, नाष्टा-जेवण करून जा. जर तुम्हाला कोरोना झाला असेल तर बरे झाल्यानंतर चार ते सहा आठवड्यांनी लस घ्या. ताप, खोकला, सर्दी असेल तर त्या दिवशी लस घेऊ नये. एखाद्या आजारावरील औषध आधीपासूनच घेत असाल तर ते सोबत घेऊन जाऊ शकता. लस घेण्यासाठी कोणतेही बंधन नाही.

लस घेताना आणि नंतर काय करायला हवे?
लस घेतल्यानंतर लसीकरण केंद्रावर अर्धा तास जरूर थांबा. कारण काही लोकांना लस घेतल्यानंतर अॅलर्जी होते. त्यात विशेष नाही, अॅलर्जी व्हायची असेल तर अर्धा तासातच होईल. एक-दोन दिवसांनी ताप, लस टोचल्याच्या जागेवर लाल होणे किंवा वेदना होऊ शकतात. मात्र, ती आपोआप एक ते दोन दिवसांत बरी होईल. घाबरण्याची गरज नाही. तरीही काही अडचण भासल्यास हेल्पलाइन क्रमांक १०७५ वर कॉल करून समस्येवर तोडगा काढू शकता.

देशात दिली जाणारी लस किती प्रभावी आहे, घेणे गरजेचे आहे का?
लस घेणे टाळू नका. प्राण्यांवरील चाचणीपासून मानवी चाचणीपर्यंत सिद्ध झाले आहे की, कोणतेही गंभीर साइड इफेक्ट्स नाहीत. जगात एक कोटी लोकांना लस देण्यात आली आहे. कोठेही लसीमुळे गंभीर साइड इफेक्ट्स झाल्याचे वृत्त नाही. जगात अद्याप पूर्णपणे लसीच्या प्रभावाची आकडेवारी आलेली नाही. स्थिती गंभीर असल्याने आपत्कालीन वापरास मंजुरी देण्यात आली आहे. महामारीची स्थिती नसती तर वर्ष किंवा सहा महिन्यांपर्यंत लसीचा प्रभाव हळूहळू पारखून घेता आला असता. जर तो ६० ते ९० टक्के असला तरीही तुम्हाला संरक्षण देईल. या विषाणूची साखळी तोडण्यासाठी लस एकमेव पर्याय आहे.

बातम्या आणखी आहेत...