आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भूमिका:अमेरिकेच्या या धमकीवर भारतीय तज्ज्ञांची कठोर भूमिका, चीनचे पाहून घेऊ, रशियन तेलावर अवलंबून पाश्चिमात्यांचे भाषण नको

दिल्‍ली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

युरोपीय संघ विषयांच्या तज्ज्ञ, माजी राजदूत भास्वती मुखर्जी यांच्या म्हणण्यानुसार, रशिया, अमेरिका आणि चीनसारख्या मोठ्या शक्तींशी भारताच्या नात्यांबाबत गेल्या ४८ तासांत अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडल्या आहेत. युक्रेनवरील लष्करी कारवाईच्या ३७ व्या दिवशी भारतात आलेले रशियाचे परराष्ट्रमंत्री सेर्गेई लाव्हरोव्ह यांची परराष्ट्रमंत्री एस.जयशंकर यांच्यासोबत खूप महत्त्वाची मॅरेथॉन बैठक झाली. हीच बाब अमेरिका आणि पाश्चिमात्त्य देशांना खुपत आहे. त्यामुळेच अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा उपसल्लागार दलीप सिंग यांनी भारताला एक प्रकारे धमकीच दिली आहे. असे करून दलीप सिंग यांनी मर्यादेचे उल्लंघन केले आहे. त्यांचे वक्तव्य मान्य केले जाऊ शकत नाही. युरोपीय देश गॅस आणि तेलात ७५% रशियावर अवलंबून आहेत. भारत आपल्या गरजेच्या २% तेल रशियाकडून खरेदी करतो. परिणाम भोगायचे असतील तर ते पाश्चिमात्त्यांना, आम्हाला नाही. पाश्चिमात्य देश रशियाच्या तेलावर अवलंबून असताना त्यांचे भाषण आम्हाला नको. दलीप सिंग यांनी मर्यादेत राहावे.

रशियाशी भारताचे संबंध अगदी वेगळे, अमेरिकेच्या या वक्तव्यातून त्या देशाचा संताप दिसतो : जनरल मलिक माजी लष्करप्रमुख जनरल व्ही. पी. मलिक म्हणाले- दलीप सिंग यांच्या वक्तव्यातून अमेरिकेचा संताप दिसतो. एक काळ असा होता की, भारत ७५% लष्करी साहित्य रशियाकडून मागवत होता. अजूनही ४८% संरक्षण करार रशियाशी होत आहेत. रशियासोबत भारताचे संबंध फक्त विक्रेता-खरेदीदार एवढेच नाहीत. अमेरिकेला हे माहीत असायला हवे की, १९६२ पासून आजपर्यंत भारताने चीनशी थेट सामना केला आहे. यापुढेही करेल. अमेरिका स्वत:ला युक्रेनचा सर्वात मोठा पाठीराखा असल्याचे सांगत होता. पण रशियाने हल्ला केला तेव्हा युक्रेनला लढण्यासाठी एकाकी सोडून देण्यात आले.

चीनने एलएसीचे उल्लंघन केल्यास रशिया भारताला वाचवण्यास येणार नाही...अमेरिकेच्या डेप्युटी एनएसएंनी मर्यादा ओलांडली
नवी दिल्ली | भारतात आलेले अमेरिकेचे डेप्युटी एनएसए दलीप सिंह यांनी म्हटले की, ‘चीनने एलएसीचे उल्लंघन केल्यास रशिया भारताला वाचवण्यास येणार नाही. चीन जेवढ्या फायद्याच्या स्थितीत असेल, तेवढाच तो भारतासाठी धोकादायक ठरेल.’ रशिया-युक्रेन युद्धानंतर रशियाच्या विरोधात अमेरिकेचे निर्बंध निश्चित करण्यात दलीप सिंह यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

बातम्या आणखी आहेत...