आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Indian Government On Covid 19 News Strain And Vaccines | Is This Coronavirus Strain More Dangerous?

नवीन कोरोना स्ट्रेनवर भारत:केंद्र म्हणाले - ब्रिटनमध्ये आढळलेल्या नवीन म्यूटेशनची देशात कोणतीही केस नाही, याचा व्हॅक्सीनवरही परिणाम होणार नाही

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
ब्रिटनमध्ये कोरोनाव्हायरसचे नवीन रूप आढळल्यानंतर खबरदारी घेतली जात आहे. विमानतळावर यूकेतून येणाऱ्या फ्लाइटमधील प्रवाशांवर विशेष लक्ष दिले जात आहे. - Divya Marathi
ब्रिटनमध्ये कोरोनाव्हायरसचे नवीन रूप आढळल्यानंतर खबरदारी घेतली जात आहे. विमानतळावर यूकेतून येणाऱ्या फ्लाइटमधील प्रवाशांवर विशेष लक्ष दिले जात आहे.
  • कोरोनाच्या नवीन स्ट्रेनमुळे घाबरण्याचे कारण नाही, मात्र सावधगिरी बाळगणे आवश्यक : डॉ. व्हीके पॉल

ब्रिटनमध्ये आढळलेल्या कोरोनाच्या नवीन स्ट्रेनमुळे जगभरात भीतीचे वातावरण पसरले आहे. मात्र भारतात या कोरोनाच्या नवीन स्ट्रोनचे एकही केस नाही, असे केंद्र सरकारने मंगळवारी सांगितले. कोरोनाचा नवीन स्ट्रेन वेगाने पसरतो. या म्यूटेशनचा केसेसच्या तीव्रतेवर आणि मृत्यूवर परिणाम होणार नाही, असे नीति आयोगाचे डॉ. व्हीके पॉल यांनी सांगितले.

देशात बनत असलेले व्हॅक्सीनबाबत त्यांनी म्हटले की, आतापर्यंत आपल्या देशाने इतर देशांमध्ये बनत असलेल्या लसीच्या क्षमतेवर याचा काहीच परिणाम होणार नाही. ते म्हणाले की, कोरोनाच्या नवीन स्ट्रेनबाबत काळजी करण्याचे कारण नाही. यामुळे घाबरण्याचेही काही कारण नाही. आत्ता आपण सावध असणे आवश्यक आहे.

देशात आता 3% पेक्षा कमी अॅक्टीव्ह रुग्ण

आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांनी सांगितले की, सुमारे साडे 5 महिन्यानंतर देशात 3 लाखांपेक्षा अॅक्टीव्ह रुग्ण आहेत. सध्या देशात एकूण प्रकरणांपैकी केवळ 3% अॅक्टीव्ह रुग्ण आहेत. मागील 7 आठवड्यांपासून दररोज आढळणाऱ्या कोरोनाच्या सरासरी रुग्णांमध्ये घट झाली आहे. देशातील 26 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये 10 हजारांपेक्षा कमी अॅक्टीव्ह रुग्ण असल्याचे त्यांनी सांगितले.

रिकव्हरी रेट 95% पेक्षा जास्त

देशाचा कोरोनामुक्तीचा दर 95% पेक्षा जास्त आहे. देशात आतापर्यंत 1 कोटी 75 हजार 422 प्रकरणे समोर आली आहेत. त्यातील 96.35 लाख रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आणि 1.46 लाख जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या देशभरात 2.90 लाख रुग्णांवर उपचार सुरू आहे.

बातम्या आणखी आहेत...