आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

चीनवर आणखी एक स्ट्राइक:सरकारने कलर टेलिव्हिजनच्या आयातीवर घातली बंदी, देशांतर्गत उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी उचलले पाऊल

नवी दिल्ली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मागील वर्षी 5836 कोटी किमतीचे टीव्ही आयात करण्यात आले होते
  • 36 ते 105 सेंटीमीटरच्या टीव्ही सेट्सवर होईल परिणाम

कोरोनाशी सुरू असलेल्या लढाई दरम्यान केंद्र सरकारने आत्मनिर्भर होण्याच्या दिशेने आणखी एक मोठे पाऊल उचलले आहे. चीनसारख्या देशांकडून कलर टेलिव्हिजनच्या आयातीवर सरकारने बंदी घातली आहे. देशांतर्गत उत्पादन वाढविणे आणि अनावश्यक उत्पादनांची आयात कमी करणे या उद्देशाने हे पाऊल उचलण्यात आले आहे. सरकारच्या निर्णयाला चीनवर आणखी एक स्ट्राइक मानले जात आहे.

आता आयातीसाठी परवाना घ्यावा लागेल

डायरेक्टरेट जनरल ऑफ फॉरेन ट्रेड (डीजीएफटी) ने कलर टेलिव्हिजनच्या आयातीवरील बंदीसंदर्भात अधिसूचना जारी केली आहे. या सुचनेनुसार आता कलर टेलिव्हिजनच्या आयातीला मुक्त श्रेणीतून हटवून प्रतिबंधित केले आहे. याचाच अर्थ आयातदारांना आता विदेश व्यापार महासंचालनालय, वाणिज्य मंत्रालयाकडून आयात करण्यासाठी परवाना घ्यावा लागेल. भारतात प्रामुख्याने व्हिएतनाम, मलेशिया, हाँगकाँग, कोरिया, इंडोनेशिया, थायलंड जर्मनी आणि चीनमधून कलर टेलिव्हिजनची आयात होते. सरकारने लादलेल्या निर्बंधाचा 36 सेमी ते 105 सेमीचे टीव्ही सेट आणि 63 सेमीपेक्षा कमी एलसीडी टीव्ही सेटवर परिणाम होईल.

2019-20 मध्ये 781 मिलियन डॉलरच्या टीव्हीची आयात

आर्थिक वर्ष 2019-20 मध्ये 781 मिलियन डॉलर म्हणजेत 5836 कोटी रुपयांचे कलर टीव्हीची आयात केली होती. यामध्ये व्हिएतनाममधून 420 मिलियन डॉलर (3199 कोटी रुपये) आणि चीनमधून 293 मिलियन डॉलर (2190 कोटी रुपये)चे कलर टीव्ही आयात केले. पॅनासॉनिक इंडियाचे सीईओ मनीष शर्मा म्हणतात की, देशांतर्गत उत्पादनांवर याचा सकारात्मक परिणाम होईल आणि ग्राहकांना उच्च प्रतीचे एकत्रित टीव्ही सेट्स मिळतील.

सरकार चीनबद्दल कठोर भूमिका घेताना दिसत आहे

लडाखच्या गलवान घाटीतील सीमावादानंतर सरकार चीनबद्दल कठोर भूमिका घेताना दिसत आहे. याआधी केंद्र सरकारने चीनच्या 59 अॅप्सवर बंदी घातली होती. बंदी घातलेल्या अॅप्समध्ये टिकटॉक, व्ही-चॅट, युसी ब्राउजर, यूसी न्यूज अॅप यांसारख्या अॅपचा समावेश होता. हे सर्व अॅप्सवर राष्ट्रीय सुरक्षेविरूद्धच्या कारवायांच्या आरोपाखाली बंदी घातली होती. अलीकडेच सरकारने यांच्या 47 क्लोन अॅप्सवर बंदी देखील घातली आहे. याशिवाय सरकारने चिनी कंपन्यांवरही अनेक प्रकारचे निर्बंध लादले आहेत.