आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभारत सरकार पेगासससारख्या नव्या स्पायवेयरचा शोध घेत आहे. अमेरिकन सरकारने पेगासस ब्लॅकलिस्ट केलेले आहे आणि भारतातही हे स्पायवेयर वादात राहिले आहे. यातच सरकार पेगाससच्या प्रतिस्पर्धी सॉफ्टवेयर कंपन्यांसोबत डीलविषयी चर्चा करत आहे. या सर्व्हेलान्स कंपन्याही भारत सरकारसमोर बोली लावण्याची तयारी करत आहेत.
फायनान्शियल टाइम्सच्या वृत्तानुसार, भारताचे डिफेन्स आणि इंटेलिजन्स अधिकारी पेगासस बनवणारी कंपनी एनएसओचा असा स्पर्धक शोधत आहे, जो जास्त चर्चेत राहिला नसेल. मानले जात आहे की सरकार नव्या स्पायवेयरच्या कंत्राटासाठी 12 कोटी डॉलरपर्यंत(सुमारे 986 कोटी रुपये) खर्च करायला तयार आहे. यासाठी अंदाजे 12 कंपन्या बोली लावू शकतात.
ग्रीसचे स्पायवेयर प्रीडेटरचे नाव हेरगिरी कांडमध्ये आले आहे
या प्रकरणाची माहिती असलेल्या सुत्रांनी सांगितले की भारतीय अधिकारी ग्रीस कंपनी Intellexa चे स्पायवेयर खरेदी करण्याचा विचार करत आहेत. या कंपनीने इस्रायली लष्कराच्या माजी अधिकाऱ्यांची मदत घेत प्रीडेटर नावाचे स्पायवेयर तयार केले आहे.
या स्पायवेअरचे नाव आधीच एका हेरगिरी कांडमध्ये आले आहे. यात ग्रीसचे हेरगिरी प्रमुख आणि पंतप्रधानही अडकले आहेत. सिटिझन लॅब आणि फेसबूकनुसार, प्रीडेटर अनेक देशांत ऑपरेशनल आहे. जिथे मानवाधिकारांचे उल्लंघन होत आहे. या देशांत इजिप्त, सौदी अरेबिया, मादागास्कार व ओमानचा समावेश आहे.
भारताला इस्रायली कंपनींच्या स्पायवेयरमध्ये जास्त रस
ही माहितीही समोर आली आहे की भारतीय अधिकारी अनेक स्पायवेयरमध्ये रस दाखवत आहेत. ज्यापैकी बहुतांश इस्रायली कंपन्यांनी बनवले आहेत. इस्रायलमध्ये सर्वात अॅडव्हान्स्ड स्पायवेयर कंपन्या आहेत. ज्या इथल्या मिलिट्रीच्या सोबत स्पायवेयर बनवतात.
स्पायवेयरच्या पर्यायात क्वॉड्रिम आणि कॉग्नाइटचा समावेश आहे. क्वाड्रिमविषयी इस्रायली अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की वॉशिंग्टन पोस्टचे पत्रकार जमाल खशोगींच्या मृत्यूनंतर या स्पायवेयरला सौदीत विकण्याचे अप्रुवल मिळाले होते.
कॉग्नाइटविषयी मेटाच्या तपासात मोठ्या प्रमाणावर स्पायवेयरच्या गैरवापराची गोष्ट समोर आल्यावर नॉर्वेच्या सॉवरेन वेल्थ फंडने याचे स्टॉक हटवले होते आणि अमेरिकेच्या वेरिंट कंपनीने याला आपल्या स्टॉकमधून वेगळे केले होते.
ग्रीकचे स्पायवेयर प्रीडेटरचे नावही हेरगिरी कांडमध्ये आले होते
या प्रकरणाची माहिती असलेल्या सूत्रांनी सांगितले की भारतीय अधिकारी ग्रीसच्या कंपनीचे Intellexa स्पायवेयर खरेदी करण्याचा विचार करत आहेत. या कंपनीने इस्रायली लष्कराच्या माजी अधिकाऱ्यांची मदत घेत प्रीडेटर नावाचे स्पायवेयर तयार केले आहे.
या स्पायवेयरचे नाव आधीच एका हेरगिरी कांडमध्ये येत आहे. ज्यात ग्रीसचे हेरगिरी प्रमुख आणि पंतप्रधानही अडकले आहेत. सिझिटन लॅब आणि फेसबूकनुसार प्रीडेटर अशा अनेक देशांत ऑपरेशनल आहे. जिथे मानवाधिकारांचे उल्लंघन होत आहे. या देशांत इजिप्त, सौदी अरेबिया, मादागास्कार आणि ओमानचा समावेश आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.