आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Indian Hockey Team Announced; Selection Of Rabichandra In The Team | Marathi News

प्रो हॉकी लीग:भारताचा हॉकी संघ जाहीर; रबिचंद्रची संघात निवड

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रो हॉकी लीगमधील अर्जेंटिनाविरुद्धच्या सामन्यासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. मिडफील्डर एम. रबिचंद्र सिंगला प्रथमच वरिष्ठ संघात स्थान मिळाले आहे. ते पदार्पण करू शकतात. तसेच स्ट्रायकर गुरजंत सिंगचे संघात पुनरागमन झाले आहे. भारत १९ व २० मार्च रोजी भुवनेश्वर येथे जागतिक क्रमवारीत सहाव्या क्रमांकावर असलेल्या अर्जेंटिनाविरुद्ध सामना खेळणार आहे.

संघ पुढीलप्रमाणे : श्रीजेश, कृष्णबहादूर पाठक, हरमनप्रीतसिंग, जुगराजसिंग, सुरेंदरकुमार, वरुणकुमार, जरमनप्रीतसिंग, अमित रोहिदास, मनप्रीतसिंग, विवेक सागर प्रसाद, हार्दिक सिंग, सुमीत, शमशेरसिंग, नीलकांत शर्मा, रबिचंद्र सिंग, गुरजंत, मनदीप, ललित उपाध्याय, शैलेंद्र लाकडा, सुखजितसिंग, अभिषेक, दिलप्रीतसिंग.

बातम्या आणखी आहेत...