आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Indian Hockey Team Semifinal Match With Germany In Tokyo Olympics; News And Live Updates

हॉकीपटूंच्या घरी उत्सव:गुरजंतची आई म्हणाली - हे कांस्य माझ्यासाठी सोन्यासारखे; मनप्रीतची आई म्हणाली - माझी प्रार्थना स्वीकारली गेली

अमृतसर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • संघात अमृतसर येथील 4 खेळाडू

टोकियो ऑलिम्पिकमध्ये अखेर भारतीय पुरुष हॉकी संघाने इतिहास रचला आहे. भारतीय पुरुष हॉकी संघाने चमकदार खेळी करत जर्मनीविरोधात कांस्यपदक जिंकले आहे. या चमकदार खेळीमुळे भारतीयांची जवळपास 41 वर्षाची प्रतिक्षा संपली आहे. कारण भारतीय संघाला मास्को येथील ऑलिम्पिकमध्ये 1980 मध्ये पदक मिळाले होते.

भारतीय संघाला त्यानंतर सतत निराशाच पदरात पडली होती. परंतु, या खेळीमुळे हॉकी टीमचा संपूर्ण भारतीयांकडून अभिनंदन आणि कौतूकांचा वर्षाव होत आहे. तर दुसरीकडे पंजाबमधील अमृतसर आणि जालंधरमध्ये खेळाडूंच्या घरी या विजयानिम्मित उत्सव साजरा केला जात आहे.

संघात अमृतसर येथील 4 खेळाडू
भारतीय पुरुष हॉकी संघात अमृतसर येथील 4 खेळाडू आहेत. यामध्ये गुरजंत सिंग, दिलप्रीत सिंग, हरमनप्रीत सिंग आणि शमशेर सिंग यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे संघात दोन गोल घेणारे सिमरनजीत सिंग हे गुरजंत सिंग यांचे चुलत भाऊ आहेत. दरम्यान, दोन्ही घरातील लोकांनी मॅच पाहिली असून विजयानंतर त्यांचा आंनद गगनात मावत नव्हता. संपूर्ण घर ढोल ताश्यावर थरकत होते.

हे कांस्य माझ्यासाठी सोन्यासारखे - गुरजंतची आई
टोकियो ऑलिम्पिकमधील हे पदक माझ्यासाठी सोन्यासारखे आहे असे गुरजंत सिंहची आई भावूक होत म्हणत होती. दरम्यान, माझ्या मुलांनी 41 वर्षाचे जूने कर्ज फेडले आहे. गुरजंत आणि सिमरन या दोन्ही भावांनी सामंजस्याने खूप चांगले प्रदर्शन केले असून यावेळी सिमरनने दोन गोल केले. 1972 नंतर भारतीय संघाने पुन्हा एकदा इतिहासाची पुनरावृत्ती केली आहे. मला विश्वासच होत नाहीये की, माझ्या मुलाने मला एवढा मोठा आनंद दिला असं गुरजंतची म्हणाली.

आम्ही पदक जिंकणार असे तो म्हणाला होता - गुरजंतचे वडील
गुरजंतचे वडील म्हणाले की, टोकियो ऑलिम्पिकला जाण्यापूर्वी आम्ही पदक घेऊनच येणार असे गुरजंतने सांगितले होते. त्यांनी त्याचे शब्द पूर्ण केले आहे. त्यांनी कोणते पदक जिंकले हे महत्वाचे नाही तर त्याने त्याचा शब्द पूर्ण केला हे माझ्यासाठी महत्वाचे असल्याचे गुरजंतचे वडील बलदेव सिंह यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, मला माझ्या दोन्ही मुलांचा अभिमान असून ते लवकर घरी यावे असही ते यावेळी म्हणाले.

माझी प्रार्थना स्वीकारली गेली - मनप्रीतची आई
भारतीय पुरुष हॉकी संघाचा कर्णधार मनप्रीत यांच्या घरीदेखील या विजयाचे उत्सव साजरे केले जात आहेत. शुभेच्छा देण्यासाठी मनप्रीत यांच्या घरी येणाऱ्यांची गर्दी जमली आहे. दरम्यान, माझी प्रार्थना स्वीकारली गेली असल्याचे मनप्रीतच्या आईने सांगितले आहे.

बातम्या आणखी आहेत...