आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Indian Institution 155th In QS World Rankings, 11 Institutions Including IIT Bombay, Delhi, Madras, Kanpur Improving Status, Teaching Expensive

क्यूएस वर्ल्ड क्रमवारी:क्यूएस वर्ल्ड क्रमवारीमध्ये भारतीय संस्था 155 व्या स्थानी, आयआयटी बॉम्बे, दिल्ली, मद्रास, कानपूरसह 11 संस्थांच्या स्थितीत सुधारणा, अध्यापन अत्यंत महागडे

जयपूर19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

वर्ल्ड क्यूएस क्रमवारी २०२३ मध्ये भारतातील संस्थांनी चांगली कामगिरी केली. असे असले तरी अद्याप एकाही भारतीय संस्थेला अव्वल १५० मध्ये स्थान पटकावता आलेले नाही. भारतातील एकूण ४१ पैकी १२ संस्थांची स्थिती सुधारली आहे. १० संस्थांच्या कामगिरीत घसरण झाली आहे. सात संस्थांनी यंदा क्रमवारीत सहभाग घेतला. एकूण ४९.५ गुणांसह आयआयएससी बंगळुरूने सर्वसमावेश अशी १५५ क्रमवारी मिळवली. देशात ही संस्था पहिल्या क्रमांकावर राहिली. गेल्या वर्षी ही संस्था १८६ व्या स्थानी होती. आयआयटी बॉम्बेदेखील १७७ हून १७२, आयआयटी दिल्ली १७७ हून १७४, मद्रास २५५ हून २५०, खरगपूर २८० हून २७०, कानपूर २७७ हून २६४, गुवाहाटी ३९५ हून ३८४ व आयआयटी रुरकीची कामगिरी ४०० हून ३६९ अशी सुधारली. एमआयटीने जागतिक पातळीवर पहिला क्रमांक संपादन केला.

अव्वल १०० मध्ये संस्था येत नाहीत? : संशाेधनात भारतीय संस्था अग्रेसर राहतात. परंतु आंतरराष्ट्रीय विद्यार्थी व अध्यापनाच्या निकषांवर संस्थांना गुण कमी मिळतात. देशातील अव्वल आयआयएससी बंगळुरूने सायटेशन प्रति फॅकल्टीमध्ये १०० गुण संपादन केले. परंतु आंतरराष्ट्रीय पातळीवरील विद्यार्थ्यांचे प्रमाण केवळ १.९ व आंतरराष्ट्रीय अध्यापन श्रेणीत ११.७ गुण संपादन केले आहेत. आयआयटीजच्या म्हणण्यानुसार परदेशातील अध्यापक मंडळींच्या पॅकेजवरील खर्च खूप जास्त आहे. त्यामुळेच अशा अध्यापकांना आयआयटीज िनमंत्रण देत नाहीत. त्याशिवाय भारतीय वातावरणाशी जुळवून घ्यायलादेखील परदेशी अध्यापकांना जास्त वेळ लागताे.

बातम्या आणखी आहेत...